दमदार बॅटरी सह आसुसचा ROG २ स्मार्टफोन सादर


आसुसचा नवा ROG २ हा नवा गेमिंग फोन २३ जुलै रोजी चीनमध्ये सादर होत असून बाकी देशात तो ४ सप्टेंबरला लाँच केला जात आहे. कंपनीने त्यांचा पहिला गेमिंग फोन ROG कॉम्पुटेक्स २०१९ मध्ये सादर केला होता. नवा फोन याचीच पुढची एडिशन आहे. या फोनची अनेक खास फिचर असून ती जगात प्रथमच या फोनमध्ये दिल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार १२० एचझेड एमोलेड स्क्रीनचा हा पहिलाच फोन आहे. ६.५९ इंची या स्क्रीनला नॉच नाही शिवाय त्याला कॉर्निंग ग्लास ६ प्रोटेक्शन दिले गेले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्लस ८५५ प्रोसेसरचा हा पहिलाच फोन १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इनबिल्ट स्टोरेजसह आहे. फोनला ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.

फोनला टू युएसबी टाईप सी पोर्ट, रिअरला ४८ एमपी व १३ एमपी वाईड अँगल कॅमेरा, फ्रंटला १३ एमपी सेल्फी कॅमेरा दिला गेला असून अनेक नव्या अॅक्सेसरिज दिल्या गेल्या आहेत. किमतीचा खुलासा अजून केला गेलेला नाही. पहिला ROG फोन ६९ हजार रुपये किमतीचा आहे. त्यामुळे नव्या फोनची किंमत त्याच्यापेक्षा थोडी अधिक असू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment