आलियाने शेअर केले नव्या घराचे फोटो


युट्यूबवर स्वतःचा चॅनल सुरु करून बॉलीवूड मध्ये या बाबतीत आघाडी घेतलेल्या आलिया भट्टने तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. अलियाबी नावाने हा युट्यूब चॅनल आलियाने सुरु केला असून त्यावरून तिने तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी चाहत्यांशी शेअर करणार असल्याचे यापूर्वीचा जाहीर केले होते.

जुहूच्या पॉश भागात आलियाने १३ कोटी रुपये खर्चून नवे घर २०१७ मध्ये खरेदी केले असून तिच्या स्वकमाईचे हे पहिले घर आहे. ती या घरात तिची बहिण शाहीन हिच्यासह राहायला आली आहे. आलियाने शुक्रवारी मुव्हिंग डे ब्लॉग अपलोड केला आहे. त्याला कॅप्शन देताना ती म्हणते, आईवडिलांच्या घरापासून दूर माझ्या स्वतःच्या हिमतीवर नवीन घरात येण्याचा अनुभव विशेष आहे. या घरात माझे आईवडील, आजीआजोबा यांना सर्वप्रथम बोलावणार असून मी त्यांची होस्ट असेन. हा आनंद मोठा आहे.

या घरात माझ्यासोबत माझी बहिण राहणार आहे. माझे हे घर ग्लॅमरस नाही. मला व्हिंटेज लुक आवडतो म्हणून ते तसेच जुन्या पद्धतीने सजविले आहे. हे घर माझ्यासारखेच साधे आणि सुंदर आहे.

Leave a Comment