चांद्रयान-2 मोहिमेमुळे भारताला होणार हे फायदे


पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपगृह चंद्रावर भारताने आपली दुसरी सर्वात महत्वाकांक्षी मोहिम चांद्रयान – 2 सोमवारी आंध्रप्रदेशतील श्रीहरीकोटावरून सर्वात शक्तीशाली रॉकेट लाँन्चर जीएसएलवी मार्क-तीनच्या माध्यमातून प्रेक्षपित केले. ही मोहिम चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व आणि भविष्यात चंद्रावर माणसाच्या राहण्याच्या संभवतेची चाचणी करेल. जवळपास 978 करोड रूपये खर्च आलेले चंद्रयान-2 ला चंद्रावर पोहचण्यासाठी 3,84,400 किलोमीटर अंतर पार करावे लागेल. हे प्रेक्षपण 15 जुलै रोजीच होणार होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे याची तारीख बदलण्यात आली होती.

चंद्रयान -2 हे चंद्राच्या दक्षिणी ध्रुव क्षेत्रात उतरेल. या क्षेत्रात आजपर्यंत कोणताही देश गेलेला नाही. इस्रोचे प्रमुख के सिवन यांच्यानुसार, मिशनांतर्गत पाण्याचा शोध घेईल. तसेच सौरमंडळातील जिवाश्मांचा देखील शोध घेईल.

असे यान पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. चंद्रयान-2 मधील 1.4 टनाचे लँडर, त्यासोबत असलेल्या 27 किलोग्रामच्या रोव्हरला चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावरील दोन क्रेंटरोच्या मध्यभागी उतरवेल. लँडिगनंतर रोव्हर चंद्रावरील मातीचे रासायनिक विश्लेषण करेल. तर ‘विक्रम’ नाव असलेले लँडर चंद्रावरील तलाव अथवा पाण्याच्या तळांचे मापन करेल. तसेच अन्य गोष्टींसह लूनर क्रस्टमध्ये खणण देखील करेल. वर्ष 2009 मध्ये चंद्रयान – 1 मार्फत चंद्रावरील पाण्याची अणूंची माहिती मिळाली आहे. तेव्हापासून भारताकडून तेथे पाण्याचा शोध सुरू आहे. कारण पाण्याच्या अस्तित्वामुळेच भविष्यात चंद्रावर मनुष्याच्या राहण्याची शक्यता आहे.

इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी सांगितले की, ‘मोहिमेंतर्गत पाण्याचा शोध घेतला जाईल. तसेच, सौरमंडळातील फॉसिल रेकॉर्ड देखील शोधले जातील. त्यामुळे आपल्या माहित पडेल की, सौरमंडळात ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांची रचना कशा प्रकारे झाली होती.’

त्याचबरोबर, या मिशननंतर भारत खाजगी उपग्रह आणि ऑरबिटिंगची डील मिळवू शकेल. म्हणजेच भारत अंतराळातील आपली क्षमता सिध्द करू शकेल व त्याच्या मदतीने आपण अन्य देशांचे उपग्रह अंतराळात पाठवण्याचा करार मिळवू शकू. तज्ञांनुसार, या मिशन अंतर्गत मिळणारा जिओ स्ट्रेटजिक फायदा कमी असेल, मात्र भारताचे कमी खर्चाते हे मॉडेल दुसऱ्या देशांना आकर्षित करेल.

नासातर्फे मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेल्या रोव्हर मिशनशी जोडलेले वैज्ञानिक अमिताभ घोष हे म्हणाले की, ‘चंद्रयान-2 च्या किंमतीच्या तुलनेत याद्वारे होणार फायदा खूप मोठा आहे. चंद्रयान-2 सारखे गुंतागुतींच्या मोहिमेमधून संपुर्ण जगाला संदेश जाईल की, भारतमध्ये गुंतागुंतीच्या, अवघड मोहिमा यशस्वी करण्याची क्षमता आहे.’

इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन म्हणाले की, ‘भारताचे लक्ष हे अंतराळाचे नेतृत्व करणारा देश म्हणून पुढे येणे हे आहे.’

Leave a Comment