इंस्टाग्रामवर विकली जात आहे मनुष्याच्या डोक्याची कवटी


सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे जेथे अनोळखी लोक एकमेकांशी मैत्री करतात आणि आपल्या गोष्टी जगाला सांगतात. मात्र आता सोशल मीडियाचा वापर उद्योगासाठी देखील केला जात आहे. एवढेच नाही तर आता फेसबूकची मालकी असलेल्या इंस्टाग्राम अॅपवर मानवाच्या डोक्याची कवटी विकली जात आहे. आश्चर्य म्हणजे लोक मानवाची कवटी विकत देखाल घेत आहेत.

इंस्टाग्रामवर मानवाच्या कवटी विकण्याचा व्यवसाय ब्रिटनमध्ये जोरदार सुरू आहे. एका रिपोर्टनुसार, मानवाच्या डोक्याच्या कवटीची खरेदी रिसर्च आणि मेडिकल सायन्ससाठी केली जात आहे. कवटीबरोबरच हडकांची देखील विक्री केली जात आहे.

ब्रिटनमध्ये मनुष्याच्या शरीराची हडकं आणि कवटी विकण्यावर बंदी नाही. त्यामुळे हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. इंस्टाग्रामवर प्रोफाईल चेक केल्यानंतर खरेदी करणारा विकणाऱ्याला मेसेज करतो. त्यानंतर व्यवहार करून डिलिव्हरी चार्ज सोबत कवटीची विक्री केली जाते.

रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये मनुष्याच्या डोक्याची कवटी विक्रीचा व्यवसाय तेजीने वाढत आहे. मागील दोन वर्षात यात झपाट्याने वाढ झाली आहे. स्टॉकहॉम युनिवर्सिटीद्वारा 2017 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, या व्यवसाय 40 लाखांपर्यंत पोहचला असून, नवीन रिपोर्टनुसार आता हा व्यवसाय 70 लाखांपर्यंत गेला आहे.

Leave a Comment