केएस भरतला लवकरच मिळू शकते भारतीय कसोटी संघात संधी – एमएसके प्रसाद


भारतीय क्रिकेट संघाचे निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी रविवारी वेस्ट इंडिज दौऱ्याठी भारतीय संघाची घोषणा केली. यंदा भारत ‘अ’ संघासाठी शानदार प्रदर्शन करणाऱ्या अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र यष्ठीरक्षक फलंदाज केएस भरतला संघात स्थान मिळाले नाही. भरत कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार होता. एम.एस. के प्रसाद म्हणाले की, ते भरतच्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे पुढील कोणत्याही मालिकेत लवकरच त्याला संधी मिळू शकते.

संघाची घोषणा करताना प्रसाद म्हणाले की, आम्ही भारत अ संघाची कामगिरी लक्षात घेतली.  मनीष पांडे, श्रेय्यस अय्यर यांनी चांगले प्रदर्शन केले. आपल्याकडे अलखित मानदंड आहे की, जर कोणताही खेळाडू दुखापत होऊन बाहेर गेला असेल, तर त्याला पुन्हा एकदा संधी दिली गेली पाहिजे. त्यामुळे रिद्धीमन साहाला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

भरतच्या प्रदर्शनाविषयी ते म्हणाले की, मी सांगू शकतो की, केएस भरतने भारत अ संघासाठी शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने मागील तीन मालिकांमध्ये तीन शतकं ठोकली आहेत. तो कसोटी संघात स्थान मिळवण्यापासून थोडेच अंतर दूर आहे. ऋषभ, भरत आणि रिद्धिमान साहा यांना काही काळासाठी आम्ही कसोटी संघात त्यांना बघू.

भरतने ऑस्ट्रेलिया अ, इंग्लंड लायंस आणि श्रीलंका अ यांच्याविरूध्द शतकं ठोकली आहेत. तसेच विकेटच्या मागे देखील चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याचे अव्हरेज 37.75 आहे आणि त्याच्या नावावर एक तिहेरी शतक देखील आहे. एकदिवसीय सामन्यात 8 शतके आणि 20 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर भारत 2 कसोटी, 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी20 खेळणार आहे.

Leave a Comment