१८ दिवसात पाच सुवर्णपदके, हिमा बनली गोल्डन गर्ल


आसामच्या कांधूलीमारी गावात शेतात काम करणारी आणि शेतातच दौडणारी हिमा दास हिने इतिहास रचला असून गेल्या १८ दिवसात विविध स्पर्धातून ५ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्यामुळे ढिंग एक्स्प्रेस असे नाव मिळालेली हिमा आता सुपर गर्ल आणि गोल्डन गर्ल या नावाने सोशल मिडीयावर ट्रेंड करते आहे.

हिमाने चेक रिपब्लिक मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४०० मीटर मध्ये शनिवारी सुवर्णपदकाची कमाई केली असून हे अंतर तिने ५२.०९ सेकंदात तोडले. शनिवारी ट्विटर वर या संदर्भातील पोस्ट करण्यात आली आहे. तत्पूर्वी २ जुलै रोजी युरोप, ७ जुलै रोजी कुंटो अॅथलॅटिक मीट, १३ जुलै ला टाबोर ग्रांप्री अश्या चार विविध स्पर्धात हिमाने सुवर्ण पदकची कमाई केली आहे. हिमा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिने गाजविलेल्या कर्तृत्वामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment