हिरेजडित सोन्याचा मोबाईल आणणार शाओमी


मुंबई – भारतीय ग्राहकांकरिता चीनची मोबाईल उत्पादक कंपनी असलेली शाओमीने ‘रेडमी के २० प्रो या नावाने ‘सोन्याचा मोबाईल तयार केला आहे. मर्यादित संख्येत म्हणजे केवळ २० हे मोबाईल असणार आहेत. मोबाईलला असलेल्या सोन्याच्या कव्हरमध्ये (प्लेट) हिरे जडविण्यात येणार आहेत. या मोबाईलची किंमत ४.८० लाख असेल, अशी माहिती शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी दिली.

कंपनीने या मोबाईलची विक्री करायची की ते भेट द्यायचे, याचा निर्णय अजून घेतला नाही. १० तोळा (१०० ग्रॅम) सोन्यापासून मोबाईलचे कव्हर हे तयार करण्यात येणार आहे. कव्हरपासून ते काढता येणार नाही. सध्या अशा पद्धतीने दोन मोबाईल तयार करण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली. केवळ भारतात या मोबाईलचा लिलाव करण्यात येणार आहे. टी-शर्ट, शूज आणि फिटनेस ब्रँड तयार करण्यासाठी शाओमी देशातील उत्पादकांशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment