10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-6)


व्यवसाय सुरू करणे ही सोपी गोष्टी नसते. योग्य नियोजन आणि गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करावा लागत असतो. मागील भागात आम्ही तुम्हाला ऑनलाईन कोण कोणते व्यवसाय सुरू करता येतील याबद्दल माहिती दिली होती. आज आम्ही तुम्हाला असेच काही व्यवसाय सांगणार आहोत, जे तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून सुरू करू शकता.

लग्नासंबंधित सल्लागार –

कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा. तेथे तुम्हाला लग्नाला अनन्य साधारण महत्त्व दिलेले आढळून येईल. भारतात तर लग्न मोठ्या धुमधडाक्यात, थाटामाटात करण्याची अनेकांना हौस हसते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. अनेक मोठमोठ्या कंपन्या या व्यवसायामध्ये शिरकाव करत आहेत. चांगली ऑनलाईन वेबसाईट बनवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचण्याचे माध्यम हे वेबसाईट असते. ग्राहकांना लग्नाच्या बाबतीत सर्व माहिती पुरवणे, खर्च वाचवणे अशा गोष्टी सल्लागार करत असतो.

ऑनलाईन कोर्स –

सध्या आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवसाय करणे कधीही फायदेशीर ठरते. तसेच ऑनलाईन व्यवसायामध्ये अगदी कमी गुंतवणूक करावी लागत असते. असाच एक ऑनलाईन व्यवसाय म्हणजे ऑनलाईन कोर्स होय. शिक्षणाची आवड सर्वांनाच असते. इंग्रजी, गणित या विषयांपासून ते विविध नवनवीन गोष्टी ऑनलाईन शिकता येत असतात. विद्यार्थी अशा कोर्सकडे अकर्षित होत असतात. तुम्ही तज्ञ असलेल्या विषयांवर तुम्ही ऑनलाईन माहिती अथवा व्हिडीओ टाकू शकता. यासाठी तुम्हा एक वेबसाईट तयार करावी लागेल. तसेच तुम्ही अन्य अधिच स्थापित व्यवसायाशी भागिदारी करून देखील हा व्यवसाय  करू शकता. यामध्ये अगदी 10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.