आता डायपरदेखील झाले स्मार्ट; ओले झाल्यावर मिळणार नॉटिफिकेशन


वियरेबल स्मार्ट डिवाईसच्या यादीत आता पॅम्पर्सचे नाव देखील जोडले गेले आहे. पॅम्पर्सने एक ‘लुमी’ नावाचे कनेक्डेट केअर सिस्टम आणले आहे. ही सिस्टिम बाळांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. डायपर ओले झाल्यावर हे सेंसर मोबाईलवर नॉटिफिकेशन पाठवेल. अ‍ॅपद्वारे बाळ कधी झोपले आणि कधी उठले याबद्दल देखील माहिती मिळेल. या अ‍ॅपमध्ये बाळांना दुध कधी पाजायचे याचा तक्ता देखील बनवता येणार आहे. त्यामध्ये स्मार्ट डायपरचा वापर कसा करायचा याबद्दल देखील सांगितले जाणार आहे. मात्र अद्याप कंपनीने याच्या किमंतीबद्दल खुलासा केलेले नाही.

कंपनीने इंटरनेटशी जोडलेले बेसिनेट्स, स्मार्ट नाइट लाइटस आणि पेसिफियर्स बॉटल देखील आणले आहे जे बाळाचे खाणे ट्रॅक करू शकेल. 2024 पर्यंत बेबी मॉनिटरचा बाजार 2.5 बिलियन डॉलर पर्यंत जाणार आहे. कंपनीने आई-वडिलांचा आवाज काढणारा अ‍ॅप देखील आणला आहे. त्यामुळे बाळाला वाटते की, आई आपल्या जवळच आहे.

तसेच सिक्युरिटी आणि प्राव्हेसी विषयी पॅम्पर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, डाटा पुर्णपणे इंक्रिप्टेड आहे. कंपनी सध्या टू फॅक्टर ऑथेंटिकेशन देत नाही. असे असले तरी लुमी हा काही पहिला स्मार्ट डायपर नाही.

याआधी गुगलने देखील 2016 मध्ये मल-मुत्राची तपासणी करण्यासाठी एक प्रॉडक्टच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. मागील वर्षी कोरियाची कंपनी मोनितने स्मार्ट डायपर सेंसरसाठी हगीजबरोबर भागिदारी केली आहे.

प्राव्हेसीबद्दल प्रश्नचिन्ह –
या डायपरच्या प्राव्हेसीबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, सेंसर असल्याने लहानपणापासूनच बाळांना ट्रॅक केले जाईल. त्यांची स्टाईल, कपडे आणि वजनाची माहिती बाजारात जाऊ शकते.

Leave a Comment