या रहस्मयी चित्राची किंमत आहे तब्बल 5712 करोड रूपये


लियोनार्डो दा विंची यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. जर तुम्हाला माहित नसेल, तर ते जगातील सर्वात मोठ्या चित्रकारांपैकी एक आहेत ज्यांची चित्र करोडोमध्ये विकली जातात. जगामध्ये खुप कमी लोक अशी आहेत, जे मृत्यूनंतर देखील आपल्या कामामुळे ओळखली जातात. लियोनार्डो दा विंची हे देखील त्यांपैकीच एक आहेत.

लियोनार्डो दा विंची यांचा जन्म 15 एप्रिल 1452 ला इटलीतील विंची शहरामध्ये झाला होता. यामुळेच त्यांच्या नावापुढे विंची हे नाव लावण्यात आले. ते आजही आपल्या प्रतिभेमुळे जगभरात ओळखले जातात. सांगण्यात येते की, ते एकाच वेळी एका हाताने लिहू तर दुसऱ्या हाताने चित्र काढू शकत असे.

जगातील सर्वात प्रसिध्द चित्र ‘मोनालिसा’ लियोनार्डो दा विंची यांनीच बनवले आहे. सांगण्यात येते की, हे चित्र वेगवेगळ्या कोनातून बघित्यावर मोनालिसाचे हस्य वेगवेगळे दिसून येते. त्याकाळी हे कसे केले गेले ? हे एक रहस्यच आहे.

लियोनार्डो दा विंची यांनी हे चित्र ते 51 वर्षांचे असताना 1503 मध्ये सुरू केले होते मात्र 1519 मध्ये त्यांच्या निधनानंतर हे चित्र अपुर्णच राहिले. याचाच अर्थ हे चित्र अपुर्ण आहे. मात्र तरी देखील अपुर्ण वाटतच नाही.

1962 मध्ये या चित्राची किंमत 100 मिलियन डॉलर म्हणजेच 688 करोड होती. आता याची किंमत 830 मिलियन डॉलर म्हणजेच 5712 करोड रुपये आहे.

या चित्राध्ये दिसणारी महिला कोण आहे ? हे देखील एक रहस्यच आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, हे चित्र लियोनार्डो दा विंची यांची एक कल्पना आहे तर काहीजण सांगतात की, हे चित्र एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे असून, त्यांनी लियोनार्डो दा विंची यांच्याकडून बनवून घेतले.

सध्या हे चित्र फ्रांसच्या लॉवरे म्युजियममध्ये आहे. तेथे एका खास रूममध्ये या चित्राला ठेवण्यात आले असून, चित्र खराब होऊ नये म्हणून, बुलेट फ्रुफ काचेत ठेवण्यात आले आहे.

लियोनार्डो दा विंची यांनी हे चित्र बनवण्यासाठी 40 मायक्रो एवढ्या जाड ब्रशने हे चित्र बनवले आहे. म्हणजेच एका केसापेक्षाही पातळ ब्रश. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या लहान ब्रशने चित्र काढून देखील आजही चित्र सुरक्षित आहे.

या चित्रामध्ये एलियन लपला असल्याचे देखील बोलले जाते. मात्र या गोष्टीची अद्याप खात्री झालेली नाही. मात्र जर तुम्ही मोनालिसाचे दोन चित्र घ्याल आणि दोन्हींचे तोंड डावे आणि उचवे असे एकत्र कराल तर मध्यभागी एक वेगळीच आकृती बनते. ही आकृती विचार करण्यास भाग पाडते.

Leave a Comment