अमेरिकेतील ‘या’ ठिकाणी खरच एलियनवर संशोधन होते का?


अमेरिकेतील ‘एरिया ५१’ बाबत सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली असल्यामुळे लोकांमध्ये या ठिकाणाबाबत आणखीनच उत्सुकता वाढली आहे. अमेरिकेतील नेवादाजवळील वाळवंटात दूरदूरपर्यंत एक परिसर असून त्याला एरिया ५१ या नावाने ओळखले जाते. अनेक वर्षांपासून या ठिकाणाबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तर या ठिकाणाबाबत अनेकांना काहीच माहीत नाही. पण एलियन्सना या ठिकाणी बंद करून ठेवल्याची अफवा आहे.

ही अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली आणि एक इव्हेंट फेसबुकवर तयार केला गेला आहे. त्यानुसार, एरिया ५१ मध्ये २० सप्टेंबर २०१९ ला जाण्याचा प्लॅन करण्यात आला आहे. यात तब्बल ९ लाख लोकांनी इंटरेस्ट दाखवला आहे. पण अमेरिकन वायुसेनेने हे एक केवळ वायुसेनेचे प्रशिक्षण केंद्र असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेतील ‘एरिया ५१’ हा सर्वात मोठा परिसर आहे. येथे एक लष्करी तळ आहे. हे ठिकाण अमेरिकेपासून ९० किमी दूर लास वेगासमध्ये आहे. ८५ हजार एकर परिसरात एरिया ५१ हा पसरलेला आहे. तर येथे विमाने आणि शस्त्रास्त्रांची चाचणी केली जात असल्याचे वायुसेनेकडून सांगण्यात येते. पण अनेक रहस्य या ठिकाणाबाबत आहेत. जी कुणाला कधीच न कळल्यामुळे त्यावर सतत चर्चा सुरू असते.

या रहस्यमय ठिकाणाबाबत जगभरातील लोकांना जाणून घ्यायचे आहे. या ठिकाणाबाबत अनेकजण वेगवेगळी मते व्यक्त करतात. कुणी सांगते की, येथे एलियन्सवर गपचूप शोध केला जातो. तर कुणी म्हणते की, एक एलियन यान यूएफओ १९४७ मध्ये याच ठिकाणी क्रॅश झाले होते. पण एनी जेकोबसन नावाच्या व्यक्तीने २०११ मध्ये त्याच्या पुस्तकात या गोष्टीचे खंडन केले होते. येथेच अमेरिकी लष्कराने पहिल्यांदा ड्रोनची चाचणी घेतली होती. ज्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सची मदत ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी घेतली गेली होती. त्यांची ऑपरेशनआधी येथेच चाचणी घेण्यात आली होती.

तर काही लोकांनी येथे एलियन्स दिसत असल्याचा दावा केला होता. पण याला काही एक पुरावा नाही. तसेच काही रिसर्चमध्ये असेही सिद्ध झाले आहे की, अमेरिकेकडून येथे गुप्त प्रकारे संशोधनही केले जाते. येथे अमेरिकी लष्कराने त्यांच्या पहिल्या ड्रोनची चाचणी घेतली होती. डी २१ असे त्याचे नाव होते. एरिया ५१ च्या रहस्यावरून आजही पडदा उठलेला नाही. अनेकांना प्रश्न पडला आहे की, असे काय येथे आहे की, हा एरिया प्रतिबंधित केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, काही फोटो एरिया ५१ चे समोर आले आहेत. मृत एलियनही त्यात दिसत आहेत. पण या फोटोबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. या परिसराशी संबंधित एक्स फाइल्स, दुसऱ्या ग्रहावरील पायलट आणि तबकड्यांशी अनेक किस्से आहेत. कुणालाही येथे जाण्याची परवानगी दिली जात नाही. एका सायन्स चॅनेलवर पहिल्यांदा काही फोटो बघायला मिळाले होते. या फोटोंमध्ये जानेवारी १९६३ मध्ये झालेल्या ए-१२ विमानाला झालेली दुर्घटना बघायला मिळते. नंतर या विमानाला एसआर – ७१ ब्लॅकबर्ड असे नाव देण्यात आले होते.

अमेरिकने शीतयुद्धाच्या काळात एअरफोर्स, सीआयए आणि नासा सुपरसोनिक आणि स्टीस्थ टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या विकासाला जगापासून लपवून ठेवायचे होते. ए-१२ हे विमान त्यावेळी २२०० मैल प्रति तासाच्या वेगाने उड्डाण घेऊ शकत होते. रडारमध्ये हा स्पीड कॅच केला जाऊ शकत नव्हता. तसेच विमानाला अल्ट्रा सेसिंटिव्ह कॅमेरे होते. जे ९० हजार फूटाहूनही जमिनीवरचे स्पष्ट फोटो काढू शकत होते.