आंबट शौकिनांनो तुमच्यावर आहे गुगल, फेसबुकची नजर


मुंबई : इन्कॉग्निटो मोडचा वापर करुन जर तुम्ही पॉर्न बघत असाल आणि असे तुम्हाला वाटत असेल की हे कोणालाही याचा थांगपत्ता लागत नाही, असा तुमचा जर समज असे तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तुमच्यावर गुगल, फेसबुकसह ऑरकल क्लाउड्स हे सर्व गुपचूप नजर ठेवून असतात आणि हे सर्वकाही खरे आहे. ही धक्कादायक बाब मायक्रोसॉफ्ट, कानेर्गी मेलन विश्वविद्यापीठ, आणि पेंसिल्वेनिया विश्वविद्यापीठ यांनी एकत्रित केलेल्या अहवालात स्पष्ट समोर आली आहे.

इन्कॉग्निटो मोडवर जाऊन जगभरात कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरणारे अनेक युझर्स पॉर्न बघतात. माहिती हा मोड वापरल्याने गुप्त राहते असे अनेकांना वाटते. पण गुगल किंवा फेसबुक इन्कॉग्निटो मोडवर पॉर्न बघणाऱ्या लोकांवरही गुप्त स्वरुपात नजर ठेवते, असे स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्ट, कानेर्गी मेलन विश्वविद्यापीठ, आणि पेंसिल्वेनिया विश्वविद्यापीठ यांनी एकत्रित केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

या अहवालानुसार, जवळपास 22 हजार 484 पॉर्न साईट्सला वेबएक्सरे नावाच्या उपकरणाद्वारे स्कॅन करण्यात आले. त्यानुसार जवळपास 93 टक्के वेब पेज हे युझर्सचा खासगी डेटा हा थर्ड पार्टीला शेअर करतात अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. गुगल आणि इतर कंपन्या यातील 74 टक्के पॉर्न वेबसाईटला ट्रॅक करतात. तर 24 टक्के पॉर्न साईट्सला ऑरेकल या सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कंपनी ट्रॅक करते. यात विशेष म्हणजे 10 टक्के पॉर्न वेबसाईटला फेसबुकही ट्रॅक करत असल्याचे या अहवालात समोर आले आहेत.

कोणताही युझर्स जर सातत्याने पॉर्न साईटचा वापर करत असेल, तर सर्वाधिक त्याला ट्रॅक केले जाते. तसेच मायक्रोसॉफ्टसह इतर कंपनींनी केलेल्या एकत्रित अहवालानुसार, पॉर्नोग्राफीच्या टॉप 10 कंपन्या अमेरिकेत आहेत. तर इतर पॉर्नोग्राफीच्या इतर कंपन्या युरोपमध्ये आहेत.

दरम्यान यासाठी जॅक नावाचे एक काल्पनिक प्रोफाईल शोध घेणाऱ्या टीमने तयार केले. आपल्या लॅपटॉपवर जॅकने पॉर्न बघण्याचा विचार केला. त्यानुसार आपल्या लॅपटॉपवरील ब्राऊजरमधील इन्कॉग्निटो मोड त्याने सुरु केले. इन्कॉग्निटो मोड सुरु केल्याने त्याची खाजगी माहिती गुप्त राहिली अशी खात्री त्याला होती. त्यानंतर त्याने एक पॉर्न साइट सर्च केली आणि एक पॉर्न व्हिडीओ सुरु केला. इन्कॉग्निटो मोड सुरु केल्याने त्याची खाजगी माहिती गुप्त राहिल अशा विश्वास त्याला होता.

फक्त तुम्ही सर्च केलेली ब्राऊंजिंग हिस्ट्री इन्कॉग्निटो मोडचा वापर हा तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर जमा होऊ देत नाही. पण ज्या वेबसाईटवर तुम्ही त्याची माहिती कोणतीही थर्ड पार्टी ट्रॅक करु शकते. तसेच त्या वेबसाईटवर तुम्ही किती वेळ होता, तुम्ही काय सर्च केले याची सर्व माहिती थर्ड पार्टी टॅकर्सकडे असते. जॅकने यानुसार सर्च केलेली सर्व माहिती आणि डेटा थर्ड पार्टीकडे पोहोचला. त्यानुसार थर्ड पार्टी ट्रॅकर्सने युआरएलच्या मदतीने पॉर्नसाईट्स सर्च केल्या आणि जॅकचा खाजगी डेटा त्या पॉर्नसाईट्सला विकला.

Leave a Comment