या गावामध्ये दररोज हजारो लोकांना वाटले जाते मोफत दूध


मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील एक असे गाव आहे, जेथे गाई पाळणारे दूध विकत नाहीत तर मोफतमध्ये देतात. हे ऐकण्यात आणि वाचण्यात थोडे आश्चर्यकारक वाटेल, मात्र हे खरे आहे. जवळपास तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या बैतूल जिल्ह्यातील चुडिया गावातील लोक दुधाचा व्यवसाय करत नाही. मिळणारे दुध गावातील लोक कुटूंबातच वापरतात आणि गरजेपेक्षा अधिक दूधाचे उत्पादन झाले तर गरज असणाऱ्यांना मोफतमध्ये दूध देतात. या गावातील एकही व्यक्ती दूध विकण्याचे काम करत नाही.

गावातील शिवचरण यादव सांगतात की, गावामध्ये 100 वर्षांपुर्वी चिन्ध्या नावाचे बाबा राहत होते. ते गोसेवक होते. त्यांनी गावकऱ्यांना दुध आणि त्याच्याशी संबंधीत वस्तुंची विक्री न करण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले. तेव्हपासून गावकरी दूध विकू शकत नाही.

त्यांनी सांगितले की, आता दूध न विकणे ही परंपरा झाली आहे. जर दूध विकले तर नुकसान होईल अशी लोकांची धारणा झाली आहे.

गावातील लोकं सांगतात की, पुर्वजांकडून ऐकले आहे की चिन्ध्या बाबांनी दुधात भेसळ करून विकणे पाप असल्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे गावातील कोणीच दूध विकत नाही आणि लोकांना मोफत दूध दिले जाईल.  संत चिन्ध्या बाबा यांचे बोलणे ही दगडावरची रेष झाली असून, तेव्हापासून गावकरी दूध मोफत देत आहेत.

तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावामध्ये 40 टक्के लोक आदिवासी आहेत. तर 40 टक्के लोक गावकरी आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात गाईंचे पालन केले जाते.

गावातील प्रमुख सुभाष पटेल सांगतात की, चिन्ध्या बाबांनी दूध न विकण्यास सांगितले होते कारण दुधाचा वापर गावातीलच लोक करतील जेणेकरून ते निरोगी राहतील. त्यांची गोष्ट लोक आजही मानतात. ज्या घरामध्ये दूध असते व ज्यांना मिळते ते आजही निरोगी आहेत.

त्यांनी सांगितले की, गावातील कोणतेच कुटूंब दूध विकू शकत नाही. दही बनले तर तेही वाटावे लागते. त्यांनी हे देखील सांगितले की, जर दुध वाचले तर त्याचे तूप बनवून बाजारात विकले जाते. अनेक कुटूंब दुधापासून तूप बनवून विकू लागले आहेत.

गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे दूध नाही विकले तरी कोणतीच आर्थिक अडचण येत नाही. आदिवासींना सोडून प्रत्येक घरात गाई-म्हशी आहेत. त्यामुळे सगळ्यांना दूध मिळते.

याशिवाय बैतूलचे एसडीएम राजीव रंजन पाडे म्हणाले की, चुडिया गावामध्ये मोफत दूध वाटले जाते याबद्दल त्यांना माहिती नव्हते.

Leave a Comment