मनापासून रडा आणि वजन घटवा


जगभरात नेहमीच अनेक विषयांवर संशोधन होत असते. त्यातून निघणारे निष्कर्ष माणसाच्या फायद्यासाठी असतात. आता या संशोधनातून आणखी एक अजब निष्कर्ष निघाला आहे. अनेक माणसे स्वभावाने हळवी असतात म्हणजे कोणत्याची बारीकसारीक कारणावरून त्यांचे डोळे भरून येतात. सर्वसाधारणपणे ही माणसाची कमजोरी मानली जाते पण नवीन संशोधन सांगते कि जर तुम्हाला वजन घटवायाचे असेल तर मनसोक्त रडा कारण त्यामुळे वजन कमी होते.


संशोधन असे सांगते कि माणूस इमोशनल झाला कि त्याच्या मेंदूत कॉर्टीसॉल या द्रव्याची पातळी वाढते. अश्रू गाळले तर ती अधिक वाढते आणि त्यामुळे वजन कमी होते. हे संशोधन एशियावन मध्ये प्रकाशित झाले आहे. अश्रू गाळले कि शरीरातील विषारी पदार्थ त्यातून बाहेर पडतात, जीव रसायन तज्ञ विलियम फ्राआम यांनी या निष्कर्षाला सहमती दर्शविली आहे.

अर्थात कोणत्याही वेळेला रडून वजन कमी होत नाही तर सायंकाळी ७ ते १० या वेळात रडले तर वजन कमी होते. ही त्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. अश्रू गळायला लागले कि शरीर फॅटची पातळी राखू शकत नाही कारण अश्रूमुळे तणाव निर्माण कारणारे हार्मोन वाहून जात असतात. यातही तुम्ही उगीचच रडत असला तर वजन कमी होणार नाही. हे रडू खऱ्याखुऱ्या भावनेने आले असेल तरच त्याचा उपयोग वजन कमी होण्यासाठी असतो असे या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment