कोट्याधीश माकड राहणार महालात


कुणाचे नशीब कधी उजळेल हे सांगणे अवघडच. मग तो माणूस असो वा प्राणी. २८ फेब्रुवारी २०१७ ला जन्मलेल्या म्हणजे आता २ वर्षाचे झालेल्या एका माकडाला असाच जॅकपॉट लागलाय. म्हणजे त्याने लॉटरी खेळून बक्षीस कमावलेले नाही तर एका दयाळू माणसाने या माकडाला कोट्याधीश केले आहे. या माणसाचे नाव आहे शुभ्रान्षु शेखरनाथ आणि माकडाचे नाव आहे मिंटू. गोष्ट आहे आसाममधील सिलचर गावात घडलेली.

शुभ्रान्षु शेखरनाथ गेली २४ वर्षे कॅनडा मध्ये इंजिनीअर म्हणून काम करत आहेत. त्याच्या सारा परिवार तिकडेच आहे. ते भारतात त्यांच्या मूळ घरी कॅनडातून आले तेव्हा त्यांची भेट या माकडाशी झाली. त्यांना या माकडाचा इतका लळा लागला कि शुभ्रान्षु शेखरनाथ त्याला भाऊ किंवा मुलगा असल्यासारखे प्रेम देऊ लागले. ते सांगतात, मिंटू माझ्या जीवनात आला आणि माझे आयुष्य बदलले. परदेशात जाण्याची ओढ संपली. त्याच्यासाठी शुभ्रान्षु शेखरनाथ त्यांची संपत्ती आणि व्यवसाय विकून एक महाल बांधणार आहेत. मिंटूसाठी त्यांनी जोडीदार शोधली असून मॅकी नावाच्या माकडीणी बरोबर ते मिंटूचे लग्न लावून देणार आहेत.

शुभ्रान्षु शेखरनाथ सांगतात, माझे कुटुंबीय कॅनडातून आले कि हा विवाह सोहळा धूमधडाक्यात होणार आहे. म्हटल्याप्रमाणे त्यांनी खरोखरच मिंटू साठी महाल बांधला तर इतिहासात त्याची नोंद होऊ शकेल.

Leave a Comment