अभिनंदन मिशीवरून पोलिसात एफआरआय दाखल


भारतीय वायूसेनेचे जाबांज हिरो विंगकमांडर अभिनंदन यांच्या शौर्याच्या कथा अजूनही ताज्या आहेत. त्यात आता अभिनंदन कट मिशीची भर पडली आहे. या मिशी कट वरून नागपूर मध्ये एक एफआरआय दाखल करण्यात आला आहे.

या मिशी मामल्याची हकीकत अशी की, ३५ वर्षीय किरण ठाकूर यांनी अभिनंदन कट मिशी ठेवली होती आणि तिचे सेटिंग करण्यासाठी ते सुनील यांच्या दुकानात गेले. पण सुनील यांच्याकडून मिशी सेटिंग करताना ती चुकून कापली गेली. त्यावर ठाकूर आणि सुनील यांच्यात भांडण झाले. ठाकूर यांच्या मते सुनील यांनी मुद्दामच मिशी कापली. हा आरोप ऐकल्यावर रागावलेल्या सुनील यांनी ठाकूर यांना दमदाटी केली तेव्हा ठाकूर यांनी सरळ पोलिसात एफआयआय दाखल केली आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतले.


सुनील यांच्यामते चुकीने हे घडले पण ठाकूर काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनीच पोलिसात तक्रार दिली. विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानी एफ १६ विमान पडल्यापासून आणि त्या नंतर पाकिस्तानच्या ताब्यात सापडून सुखरूप मायदेशी परतल्यापासून त्यांची वैशिष्ठपूर्ण मिशी देशात खूपच लोकप्रिय बनली आहे.