जगातील सर्वात ‘प्रभावशाली’ पुरूषांच्या यादीत पंतप्रधान मोदी सहाव्या स्थानावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगामध्ये सर्वाधिक प्रभावशील आणि आवडते भारतीय पुरूष आहेत. अमिताभ बच्चन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. महिलांच्या श्रेणीमध्ये अभिनेत्री दिपिका पादूकोन पहिल्या क्रमांकावर आहे. ब्रिटनची इंटरनेट मार्केट रिसर्च आणि डाटा एनालिटिक्स कंपनी ‘युगोव्ह’ने या वर्षातील जगातील टॉप 20 प्रभावशाली पुरूष आणि महिलांची यादी जाहीर केली आहे. बिल गेट्स या वर्षी देखील सर्वात प्रभावशाली आणि आवडते पुरूष आहेत. महिलांमध्ये मिशेल ओबामा यांनी एंजेलिना जॉलीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. मिशेल या अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी आहेत. तर एंजेलिना जॉली हॉलिवूडची अभिनेत्री आहे.

जगातील 20 सर्वाधिक प्रभावशाली पुरूष –

नाव (टक्केवारी)

  1. बिल गेट्स – 9.6
  2. बराक ओबामा – 9.2
  3. जॅकी चॅन – 5.7
  4. शी जिनपिंग – 5.1
  5. जॅक मा – 4.9
  6. नरेंद्र मोदी – 4.8
  7. क्रिस्टिआनो रोनाल्डो – 4.2
  8. दलाई लामा – 4.2
  9. लियोनेल मेस्सी – 3.8
  10. ब्लादिमिर पुतीन – 3.7
  11. वॉरेन बफे – 3.3
  12. अमिताभ बच्चन – 2.9
  13. एलॉन मस्क – 2.9
  14. डोनाल्ड ट्रम्प – 2.6
  15. पॉप फ्रांसिस – 2.4
  16. शाहरूख खान – 2.2
  17. इमरान खान – 1.9
  18. सलमान खान – 1.7
  19. रेसेप तैयप एर्डोगन – 1.5
  20. एंडी ला – 1. 5

जगातील 20 सर्वाधिक आवडत्या महिला – 

  1. मिशेल ओबामा – 8.8
  2. ओपेरा विनफे – 6.9
  3. एंजेलिना जॉली – 6.8
  4. क्वीन एलिजाबेथ 2 – 5.9
  5. एम्मा वॉटसन – 4
  6. मलाला युसुफजाई – 3.9
  7. पँग लियुआन – 3.9
  8. हिलेरी क्लिंटन – 3.6
  9. तू यूयू – 3.5
  10. टेलर स्विफ्ट – 3.2
  11. मॅडोना – 3
  12. एंजेलिना मार्केल – 2.8
  13. दिपीका पादूकोण – 2.8
  14. प्रियांका चोप्रा – 2.8
  15. एलेन डीजेनर्स – 2.7
  16. ऐश्वर्या रॉय – 2.7
  17. सुष्मिता सेन – 2.2
  18. थेरेसा मे – 2
  19. मिलेनिया ट्रम्प – 1.6
  20. यांग मी – 1.3

41 देशातील 42 हजार पेक्षा अधिक लोकांच्या ऑनलाईन मुलाखतीद्वारे जमा करण्यात आलेल्या डाटाच्या आधारावर ही रँकिंग करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रमवारी दोन अंकानी वाढली आहे. मागील वर्षी ते 8व्या स्थानावर होते. अमिताभ बच्चन यांचा क्रमांक घसरला आहे. तर शाहरूख आणि सलमान खान यांनी प्रथमच यादीत स्थान मिळवले आहे.

टॉप-20 महिलांच्या यादीत दिपीका पादूकोनच्या क्रमांकात कोणताच बदल नाही. मागील वर्षी देखील ती 13 व्या स्थानावरच होती. प्रियांका चोप्रा दोन क्रमांकानी खाली आली आहे. ऐश्वर्या रायचा क्रमांक देखील घसरला आहे. तर सुष्मिता सेनने यंदा प्रथमच स्थान मिळवले आहे.

Leave a Comment