ही महानगरपालिका देणार तुमच्या घरातील कार्यक्रमांसाठी मोफत भांडी


देशातील सर्वात साफ शहर असणाऱ्या इंदोर शहराला डिस्पोजल फ्री अर्थात कचऱ्यांच्या विल्हेवाटापासून मुक्त करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जर तुमच्या घरात कोणताही कार्यक्रम असेल तर तुम्हाला पाहुण्यांना जेवण देण्यासाठी डिस्पोजल प्लेट, वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. यासाठी महानगरपालिकेच्या टॉल फ्री क्रमांकावर कॉल करून बुकिंग करावे लागेल  व त्यानंतर महानगरपालिका तुम्हाला मोफत वापरण्यासाठी भांडी देईल.

कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या डिस्पोजल वस्तूंचा वापर करू नये ही यासाठी एक अट असणार आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या सुविधेचे नाव ‘आयएमसी भांडे बँक’ ठेवण्यात आले आहे. देशातील पहिलीच अशी सुविधा असेल जेथे लोकांना महानगरपालिकेतर्फे भांडी पुरवली जातील.

500 लोकांच्या कार्यक्रमासाठी भांडी तैयार –
सुरूवातीला महानगरपालिकेने 500 लोकांच्या कार्यक्रमाच्या हिशोबाने भांड्यांची व्यवस्था केली आहे. टॉल फ्री क्रमांक (0731-4987161) सह याचे ऑफिस शहरातील बंगाली चौकात आहेत. लोकांना कार्यक्रमाचे बुकिंग आधीच करावे लागणार आहे. तसेच त्यांना स्वतः ऑफिसमधून भांडी घेऊन जाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच भांडी धुऊन परत देखील करावी लागणार आहे.

फीडबॅकचे होणार विश्लेषण –
महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या भांड्यांमध्ये भाग असणारी ताटं, ग्लास आणि प्लेट ताट असणार आहेत. भांड्यांचा वापर करणाऱ्यांना देखील दुसऱ्यांना ही भांडी वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. प्रत्येक आयोजकाची रजिस्टरमध्ये नोंद होणार असून, त्यांचा फीडबॅक देखील लिहून घेतला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला या फिडबॅकद्वारे या व्यवस्थेचे विश्लेषण केले जाईल.

प्लॅस्टिक –डिस्पोजलमुळे नुकसान –
इंदोरच्या महापौर मालिनी गौड यांनी सांगितले की, हा प्रोजेक्ट आम्ही पुर्ण शहराला डिस्पोजल मुक्त बनवण्यासाठी सुरू केला आहे. डिस्पोजल आणि प्लॅस्टिकने केवळ नुकसान होत आहे. यामुळे चेंबर देखील बंद पडतात आणि नाले देखील खराब होतात. सुरूवातीला आम्ही 500 भांड्यांची व्यवस्था केली आहे. लोकांची मागणी बघून आम्ही भांडी वाढवणार आहोत. जेणेकरून लोकांना कार्यक्रमामध्ये मदत होईल.

Leave a Comment