वाहन विमा खरेदी करताना घ्या या गोष्टींची काळजी


सध्या देशात बोगस मोटार इन्श्युरन्स पॉलिसींमध्ये वाढ होत आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार दोन वर्षात तब्बल 53.7 करोडच्या बोगस मोटार इन्श्युरन्स पॉलिसी विकल्या गेल्या आहेत. तर अशा प्रकरणांची संख्या ही 498 वरून वाढून 1192 वर गेली आहे.

वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये सांगितले की, 2016-17 मध्ये 498, 2017-18 मध्ये 823 आणि 2018-19 मध्ये बोगस पॉलिसी विक्री गेल्याची ही संख्या वाढून 1192 वर पोहचली आहे.

क्लेम मिळत नाही –
यामध्ये सर्वाधिक बोगस पॉलिसी या ट्रक चालक आणि टू-व्हीलर चालकांना देण्यात आल्या आहेत. या पॉलिसी त्या लोकांनी खरेदी केल्या आहेत, जे रस्त्यावर पोलिस तपासणीपासून वाचण्याचा प्रयत्न करतात. एका खऱ्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीची किंमत 10 हजार आहे. मात्र बोगल पॉलिसी 5 ते 6 हजारामध्ये मिळते. याशिवाय ग्राहकांना हे माहित असते की, या पॉलिसीमुळे केवळ पोलिस तपासापासून वाचू शकतो, मात्र दुर्घटनेत झाल्यावर कोणताही क्लेम मिळणार नाही.

चलनापासून वाचण्यासाठी पॉलिसी –

देशात जवळपास 70 टक्के वाहनं ही बिना इंन्श्युरन्सची चालत आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, 2016 मध्ये KCPL जनरल इंन्श्युरन्स कंपनी लिमिटेड आणि 2019 मध्ये गोन जनरल आणि मॅरींस टेक्नोलॉजीबद्दल बोगस पॉलिसी विक्री केल्याची तक्रार आली आहे. यातील बऱ्याच पॉलिसी या सेंकड हँड गाड्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. जेणेकरून ट्रफिकच्या दंडापासून वाचता येईल.

पॉलिसीवर बारकोड्स आणि थ्रीडी होलोग्राम  –

अनेक कंपन्यानी या समस्येतून वाचण्यासाठी फिक्स बार कोड्स आणि थ्रीडी होलोग्राम देणे सुरू केले आहे. फिक्स बार कोड्सचा फायदा होतो की, स्कॅन करताच पॉलिसीबद्दल सर्व माहिती मिळते. याशिवाय कंपन्यांनी पोलिसांना खरी आणि बोगस पॉलिसी लक्षात यावी यासाठी अभियान देखील सुरू केला आहे.

याशिवाय वाहनाच्या मालकांना फसवण्यासाठी गँग बनवून त्यांना लुटले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांना अशा एका गँगची माहिती मिळाली आहे. या गँगने दोन वर्षात 800 पेक्षा अधिक बोगस पॉलिसी टू -व्हीलर चालकांना विकल्या आहेत. या गँग कमी किंमतीच्या पॉलिसी दाखवून लोकांची लूट करतात.

पॉलिसी रिन्यू करणाऱ्यांना केले जाते टार्गेट –
अनेक वेळा पॉलिसी रिन्यू करणाऱ्या टू-व्हीलर धारकांना टार्गेट केले जाते. आरटीओच्या डाटाबेसद्वारे लोकांना फसवले जाते. याशिवाय बोगस पॉलिसी देण्यासाठी लेटर हेड आणि स्टॅम्पचा देखील वापर करतात.

कशी ओळखाल खरी आणि बोगस पॉलिसी ?

जर तुम्ही देखील मोटर इन्श्युरन्स घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला देखील खरी आणि बोगस पॉलिसी याबद्दल माहिती हवी. पॉलिसी योग्य व्यक्तीकडूनच खरेदी करा. याशिवाय ऑनलाईन खरेदी करत असाल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच खरेदी करा.

लक्षात ठेवा की, पॉलिसी खरेदी करताना, चेक अथवा ऑनलाईन ट्रांजेक्शनच करावे. कंपनीच्या नावानेच चेक द्यावा, कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चेक देऊ नये.

जर तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टीकडून अथवा व्यक्तीकडून पॉलिसी घेतली असेल, तर तुम्हाला ई-मेल त्याची माहिती आलेली असेल. जर तुम्हाला माहिती आली नसेल तर इंन्श्युरन्स कंपनीच्या कॉल सेंटरला कॉलकरून पॉलिसी तपासून घ्या.

कोणत्याही माहित नसलेल्या कंपनीकडून पॉलिसी खरेदी करू नये. जर तुम्हाला कोणत्याही कंपनीबद्दल शंका असेल भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जाऊन कंपनींच्या यादीत त्या कंपनीचे नाव तपासा. तसेच पॉलिसीबद्दल देखील माहिती तुम्हाला तेथे मिळेल.

IRDAI ने काही वर्षांपुर्वी विमा कंपन्यांना वाहन विमा पॉलिसी वर एक क्यूआर कोड प्रिंट करणे अनिवार्य केले होते. याद्वारे तुम्ही पॉलिसीची माहिती क्यूआर कोड स्कॅनकरून मोबाईलवर तपासू शकता. भारतामध्ये डिसेंबर 2015 पासून विकल्या गेलेल्या पॉलिसींवर एक क्यूआर कोड असतो.

Leave a Comment