50 वर्षांपुर्वी मानवाने ठेवले होते चंद्रावर पहिले पाऊल


50 वर्षांपुर्वी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अपोलो-11 मिशन अंतर्गत पहिल्यांदा चंद्रावर मानवाला पाठवले होते. या मिशनबरोबरच नील आर्मस्ट्राँग चद्रांवर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले होते. आर्मस्ट्राँग यांच्यानंतर काही मिनिटांनी एडविन बज एल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. तिसरे आंतराळवीर मायकल कॉलिसने ऑरबिट पायलटची जबाबदारी घेतली होती.

अपोलो-11 चा उद्देश होतो की, यामध्ये असलेले तिन्ही अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, एडविन बज एल्ड्रिन आणि मायकल काँलिस यांना सुरक्षित चंद्रावर पोहचवणे व त्यांना परत पृथ्वीवर आणणे. मायकल कॉंलिंस पायलट असल्याने अपोलो-11 मध्ये उपस्थित होते. तर नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन बज एल्ड्रिन चंद्रांच्या जमीनीवर उतरले होते.

20 जुलै 2019 ला नील आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रिन चंद्रावर पोहचलेल्या घटनेला 50 वर्ष पुर्ण झाली आहेत. अपोलो-11 या अंतरिक्ष यानाला 1969 मध्ये अमेरिकेच्या कॅनेडी स्पेस सेंटर लाँच कॉम्पलेक्स 39ए वरून सकाळी 8.32 ला लाँच करण्यात आले होते. ज्या लूनर मॉड्यूलवरून दोन्ही अंतराळवीर अपोलो-11मधून चंद्रावर पोहचले होते त्याला ‘द ईगल’ असे नाव देण्यात आले होते.

हे दोन्ही अंतराळवीर 21 तास 31 मिनिट चंद्रावर थांबले होते. एडविन एल्ड्रिन यांनी आर्मस्टाँग यांच्यांतर 19 मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. दोघे अंतरिक्ष यानामध्ये 2 तास 15 थांबले होते. मात्र आर्मस्ट्राँग आणि एल्ड्रिन यांच्यासाठी चंद्रावर पोहचण्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता.  या दोन्ही अंतराळवीरांचा पृथ्वी रेडिओ संपर्क तुटला होता. त्यानंतर ऑनबोर्ड कंम्प्युटरमध्ये देखील एरॉर आला होता.

एवढेच नाही तर द ईगलचे इंधन देखील कमी झाले होते. मात्र आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रिन यांनी दोघांनी मिळून यशस्वीरित्या अडचणींचा सामना करत 20 जुलै 1969 ला चंद्रावर पाऊल ठेवले. नील आर्मस्ट्रॉग यांचे 82 व्या वर्षी 25 ऑगस्ट 2012 ला निधन झाले.

तीन अंतराळवीरांचे हे यान चंद्राचा प्रवास करून 24 जुलै 1969 ला पुन्हा पृथ्वीवर परतले. यांच्या यानाची लँडिंग प्रशांत महासागरात करण्यास सांगितले होते. अपोलो-11 मिशनमध्ये जगभरातील 40 हजार लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

चंद्रावर पोहचण्याचा प्रवास कसा सुरू झाला ?
2 मे 1945 – दुसरे विश्व युध्द समाप्तीकडे जात होते. याच दरम्यान वॉनर वॉन ब्रॉन नावाच्या नाझी-जर्मन वैज्ञानिकाने अमेरिकी सैनिकांसमोर आत्मसमर्पण केले.सैन्य त्यांना घेऊन अमेरिकेला गेले व ते तेथे बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रमात काम करू लागले.

29 जुलै 1958 – या दिवशी नासाची स्थापना करण्यात आली. 1960 मध्ये वॉन ब्रॉनच्या टीमला यामध्ये सामिल करण्यात आले. या टीमने सैटर्न – 5 नावाच प्रेक्षपण यान बनवले. याच प्रक्षेपण यानाचे मदतीने अपोलो मिशनला चंद्रावर घेऊन जाण्यात आले.

25 मे 1961 – अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना तत्कालिन राष्ट्रपती जॉन एफ कॅनेडी म्हणाले की, 1960 पर्यंत अमेरिका मानवाला चंद्रावर घेऊन जाईल आणि सुरक्षित परत आणेल.

अपोलो मिशन –
अपोलो 1 – जानेवारी 1967 ला प्री-लाँच परिक्षणाच्या दरम्यान फ्लॅश फायरच्या कारणामुळे गुस ग्रिसम, एड व्हाइट आणि रॉजर शैफे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नासाने आपला कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने सुरू केला.

अपोलो 7 – 11-12 ऑक्टोंबर 1968 ला वॉल्टर शिरा, वॉल्टर कनिंगघम आणि डॉन आयसल यांना घेऊन पहिले अपोलो मिशन पृथ्वीच्या कक्षेत 11 दिवस राहिले.

अपोलो 8 – 21-27 डिसेंबर 1968 ला फ्रँक बॉर्मन, बिल एडर्स आणि जिम लॉवेल यांना सैटर्न 5 रॉकेटातून अंतराळात पाठवण्यात आले. ते चंद्राच्या कक्षेच्या आजबाजूला राहिले आणि एडर्सने पृथ्वीचे फोटो काढले,

अपोलो 9 – 3-13 मार्च 1969 ला जेम्स मॅक्डीवट, रसेल शीकर्ट आणि डेव्हिड स्कॉट पृथ्वीच्या कक्षेत राहिले व अंतरिक्ष यानाचे मुख्य कमांड मॉड्युल लेनर मॉड्यूल वेगळे होण्याचे प्रशिक्षण केले.

अपोलो 10 – 10-26 मे 1969 थॉमस स्टेफर्ड, युजीन कर्नन आणि जॉन यंग यांनी चंद्रावर उतरण्यासाठी पुर्ण तयारी केली होती. लूनर मॉड्यूल चंद्राच्या 16 किलोमीटर जवळ पोहचले होते.

अपोलो 11 – 16-24 जुलै 1969 ला नील आर्मस्ट्राँग, एडविन एल्ड्रिन आणि मायकल कॉलिंस चंद्रावर पोहचले. आर्मस्ट्राँग चंद्रावर पोहचणारे पहिले व्यक्ती बनले.

अपोलो 12 – 12-24 नोव्हेंबर  1969 चार्लस कोनर्ड, एलन बीन आणि रिचर्ड गोर्डन यांनी सर्वेयर 3 रॉकेटचे तुकडे शोधले आणि अंतरिक्ष यानामुळे चंद्राच्या वातावरणावर पडणाऱ्या प्रभावांचे संशोधन केले.

अपोलो 13 – 11-17 एप्रिल 1970 ला जिम लॉवेल, फ्रेड हॅज आणि जॅक स्वीगर्ट हे चंद्रावर पोहचू शकले नाही. यानामध्ये असलेल्या ऑक्सिजन टॅकचा स्फोट झाला होता. त्यानंतर ते सर्व लूनर मॉड्य़ूलचा वापर करत पृथ्वीवर परत आले.

अपोलो 14 – 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 1971 पर्यंत एलन शेफर्ड, एअर मिशेल आणि स्टुअर्ट रूसा यांनी चंद्रावर वर 2.7 किलोमीटर चालले व तेथे गोल्फ देखील खेळले.

अपोलो 15 – 26 जुलै  ते 7 ऑगस्ट 1971 ला डेव्हिड स्कॉट, जेम्स इर्विन आणि अल्फ्रड वार्डन हे लूनर रोवर घेऊन चंद्रावर गेले. तेथे त्यांनी 27 किलोमीटर त्याला चालवले.

अपोलो 16 – 16-27 एप्रिल 1972 ला जॉन यंग, चार्ल्स ड्यूक आणि केन मॅटिग्ली नासाचा दुसरा रोवर मशीन घेऊन चंद्रावर गेले. मात्र काही समस्यामुळे या मिशनचा कालावधी कमी करण्यात आला.

अपोलो 17 – 7-19 डिसेंबर 1972 ला सुगेन कर्नन,    हॅरिसन शिमिट, रोनल्ट एवान्स यांनी अपोलोच्या शेवटच्या मिशनमध्ये चंद्रावर 7 तास चालले. ते आपल्यावर काही नमुने देखील घेऊन आले होते.

अपोलो 18-20 – बजेटच्या कमी मुळे मिशन येथेच संपले. पुर्ण 11 वर्ष चाललेल्या या मिशनमध्ये 25.4 बिलियन डॉलरचा खर्च झाला. आजच्या नुसार हा खर्च 160 बिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे.

Leave a Comment