सुप्रीम न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन


भारताच्या सुप्रीम न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. ही नवी इमारत सौर उर्जा, पर्यावरण आणि जलसंरक्षण युक्त असून १२. १९ एकर परिसरात आहे. या इमारतीसाठी ८८५ कोटी रु. खर्च आला आहे. जुन्या इमारतीशी ही नवी इमारत भूमिगत मार्गांनी जोडली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व प्रशासकीय काम या इमारतीत केले जाणार असले तरी दावे सुनावणी मुळच्या इमारतीतच होणार असल्याचे समजते.

कोविंद यांनी इमारत उद्घाटन केले त्याचवेळी सुप्रीम कोर्टाचे सर्व निर्णय ९ भाषेत अनुवाद करण्याच्या सुविधेचे उद्घाटन सुद्धा केले. हे निर्णय सुप्रिम कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहेत. नवीन इमारतीत सुप्रीम कोर्टाच्या सर्व फाईल्सचे डिजिटल रेकॉर्ड ठेवले जाणार असून त्यासाठी आयटी सेल स्थापन केला गेला आहे. इमारतीत ८५५ सीसीटीव्ही आहेत तसेच तीन भूमिगत मार्ग आहेत. पैकी एक न्यायाधीश वर्गासाठी दुसरा रेकॉर्ड कागदपत्रे ने – आण करण्यासाठी तर तिसरा वकिलांसाठी आहे.

या इमारतीत १ लाख लिटर पाणी रेन हार्वेस्टिंगमधून जमा करण्याची सोय केली गेली आहे तसेच दोन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसविले गेले आहेत. या इमारतीच्या उभारणीत जुन्या इमारतींचे डबर म्हणजे २० लाख डीमॉलीशन ब्लॉक वापरले गेले आहेत. देशात कोणत्याची इमारतीत आजपर्यत इतक्या प्रमाणात मलबा वापरला गेलेला नाही. येथे १८०० वाहने पार्क करण्याची सुविधा आहे. संपूर्ण इमारत एसी असून त्यात ४० टक्के वीज सौर उर्जेतून मिळणार आहे. दोन मोठी ऑडीटोरीयम्स, एक मिटिंग रूम आणि एक राउंड टेबल कॉन्फरन्स रूम आहे. एलइडी लाईट सेन्सरबेस्ड आहेत त्यामुळे इमारतीत कुणी नसेल तर ते आपोआप बंद होतील.

Leave a Comment