कपिल देवला फुटबॉल मधला सर्वोच्च भारत गौरव सन्मान


भारताचे माजी क्रिकेट कप्तान कपिल देव यांना फुटबॉल क्लब इस्ट बंगालच्या स्थापना दिनानिमित्त १ ऑगस्टरोजी होत असलेल्या कार्यक्रमात फुटबॉल साठी असलेल्या भारत गौरव हा सर्वोच्च सन्मान दिला जाणार आहे. इस्ट बंगाल क्लब कपिल यांच्या प्रमाणेच स्टार फुटबॉल खेळाडू बाईचुंग भूटीया यालाही विदाई सन्मानाने गौरवणार आहे.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये सर्वप्रथम क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर कपिल यांनी फुटबॉल आणि गोल्फ खेळण्यास सुरवात केली होती. २२ जून १९९२ ला त्यांनी इस्ट बंगाल क्लबशी करार केला आणि सहा दिवसांनी मोहन बागान विरुद्ध प्रदर्शनी सामना स्ट्रायकर म्हणून खेळला होता.

बायचुंग भुटीया याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा करताना इस्ट बंगाल शताब्दी वर्षात किमान पाच मिनिटे फुटबॉल खेळण्याची आणि क्लब फुटबॉल संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यालाही निरोप म्हणून विशेष सन्मान दिला जाणार आहे. याचबरोबर मनोरंजन भट्टाचार्य व भास्कर गांगुली यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दिला जात आहे. तसेच पी. के बॅनर्जी यांना प्रशिक्षकांचे प्रशिक्षक हा मानाचा पुरस्कार दिला जात आहे.

Leave a Comment