अशी झाली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सुरूवात, हे आहे प्रमुख काम


आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच आयसीजे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे. जून 1945 मध्ये याचे गठन करण्यात आले होते तर एप्रिल 1946 पासून कार्य सुरू आहे.

आयसीजेचे मुख्य कार्यालय हे नेंदरलँडच्या हेग येथे आहे. संयुक्त राष्ट्राशी संबंधीत सहा संघटनांपैकी हे एक मात्र संघटन आहे ज्याचे कार्यालय अमेरिकेचे न्युयॉर्कमध्ये नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांमधील विवाद आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सोडवणे हे याच प्रमुख कार्य आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात. त्यांना संयुक्त राष्ट्र महासभा आणि सुरक्षा परिषदेद्वारे 9 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडले जाते.

1920 मध्ये संयुक्त राष्ट्र हे लीग ऑफ नेशन्स असताना, त्यावेळी आयसीजेचे जुने रूप ‘पर्मानेंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टीस’ होते. दुसऱ्या विश्व युद्धानंतर या दोन्ही संस्थांमध्ये बदल करत, आजच्या संस्थांची निर्मिती करण्यात आली.

Leave a Comment