‘ट्रोल’ होण्यापासून वाचवण्यासाठी ट्विटर आणत आहे नवीन फिचर


मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने युजर्सच्या सुविधेसाठी ‘हाईड रिप्लाय’ हे नवीन फिचर आणले आहे. या फिचरचा फायदा असणार होणार आहे की, यामुळे युजर्सकडे त्यांचे ट्विट आणि रिप्लाय कोण बघणार याबाबतचे नियंत्रण असेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हाईड रिप्लाय ट्विटरचे नवीन प्राव्हेसी फिचर असणार आहे. मात्र ट्विटरचे हे नवीन फिचर सध्या मोजक्याच देशात सुरू आहे.

हे फिचर लाईव्ह झाल्यानंतर युजर्सकडे विकल्प असेल की, कोणत्या पोस्टवर रिप्लाय हाईड हवा आहे की नाही. म्हणजेचे ट्विटवर आलेले रिप्लाय तुम्ही लपवू शकता. या फिचरला लागू करण्यासाठी ट्विटच्या बरोबर दिसणाऱ्या तीन बिंदूवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर हाईड रिप्लाय हा पर्याय निवडावा लागेल. मात्र हे फिचर कायमचे लागू करण्यासाठी युजर्सकडे परवानगी नसेल. म्हणजेच तुम्ही कायम स्वरूपी हाईड फिचर लागू करून ठेवू शकत नाही.

काय होईल फायदा ?
या फिचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, जर तुम्हाला कोणी ट्रोल करत असेल तर तुम्ही त्याचे रिप्लाय हाईड करू शकता. यामुळे दुसऱ्या लोकांपर्यंत त्याचे रिप्लाय जाणार नाहीत. हे फिचर सध्या फक्त कॅनेडामध्ये सुरू आहे.

याशिवाय ट्विटरने त्यांचे डेस्कटॉप व्हर्जनचे इंटरफेस देखील बदलले आहे. ट्विटरचे डेस्कटॉप व्हर्जन आता मोबाईल अॅप प्रमाणेच दिसत आहे. मात्र काही युजर्सला नवीन इंटरफेस दिसत नाही. ट्विटरच्या या नवीन इंटरफेसबद्दल सांगायचे तर यात तुम्हाला नवीन नॅव्हिगेशन मिळेल.

Leave a Comment