कुलभूषण यांचा खटला भारताने अवघ्या एका रुपयात जिंकला


नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला मोठे यश मिळाले. जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि राजनैतिक संपर्काची त्यांना अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले. नाममात्र एक रूपया मानधन घेऊन या खटल्यात वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी जाधव व भारताची बाजू मांडली. तर दुसरीकडे या प्रकरणासाठी पाकिस्तानने तब्बल २० कोटी रुपये खर्च करुनही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना घुसखोर ठरवण्यासाठी त्यांच्या वकिलांसाठी चक्क २० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. यासंदर्भात आयएएनएस या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या लोकसभेमध्ये मागील वर्षी अर्थसंकल्प मांडताना आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांचा खटल्याच्या खर्चासंदर्भात उल्लेख केला होता. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडणारे वकील खावर कुरेशी यांना २० कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती अर्थसंकल्प मांडताना लोकसभेतील सदस्यांना देण्यात आली.

Leave a Comment