आपल्या मोबाईलची बॅटरी वारंवार गरम होत असल्यास…


आपला स्मार्टफोन नेहमी गरम होत असतो अशी ओरड आपल्यापैकी अनेकांची असते. फोनचे तापमान चार्जिंग करत असताना किंवा कॉल सुरू असताना वाढते. आपण नवीन फोन घेतानासुद्धा विचारतो की, फोन गरम नाही ना होणार? पण फोन गरम होण्या मागचे कारण वेगळेच असते.

अनेक अॅप्स आपण बॅकग्राउंडला तशीच सुरु ठेवतो. त्यामुळे बॅटरी लवकर उतरते आणि फोन जास्त गरम होतो. फोनची बॅटरी संपेल म्हणून फुल्ल चार्जिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा 100 टक्के चार्जिंग झाल्यानंतरही सुरु ठेवल्यास फोन गरम होत राहतो. यासाठी बॅटरी फुल्ल झाल्यावर चार्जिग सुरु राहणार नाही याची काळजी घ्या.

स्क्रीनचा ब्राइटनेस जास्त असेल तर त्याचाही परिणाम बॅटरीवर होतो. यासाठी आवश्यकता नसेल तेव्हा फोनचा ब्राइटनेस कमी ठेवा. अॅप्स अपडेट तुम्ही ठेवलीत तर बॅटरी गरम होणार नाही. कारण फोनच्या सिस्टिमवर अनेक अॅप्समध्ये असलेले बग ताण वाढवतात. बग्स अपडेटमध्ये काढलेले असतात. त्यामुळे बॅटरी गरम होणार नाही.

फोन गरम झाला तर त्याला असलेले कव्हर थोड्या वेळासाठी काढून ठेवा. त्यामुळे फोन थोडावेळ का होईना पण थंड होईल. याशिवाय इतर कोणतेही उपाय न करता थेट सर्व्हिस सेंटरमध्ये देणे ते आपल्या फायद्याचे ठरेल.