या क्रिकेटपटूचे लग्नानंतर देखील होते अनेक महिलेंशी विवाहबाह्य संबंध


पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने एका टिव्ही शो दरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अब्दुल रज्जाकने लग्नानंतर देखील त्याचे 5 ते 6 महिलांबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रज्जाक ही गोष्ट हसत हसत सांगत होता व त्याला या गोष्टीचा गर्व देखील वाटत होता.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 39 वर्षी अब्दुल रज्जाक या गोष्टींचा खुलासा करत असताना, तेथे उपस्थित लोक टाळ्या वाजवत होते. तसेच रज्जाक यांनी सांगितले की, त्यांचे एक संबंध जवळपास दीड वर्ष सुरू होते.

एंकरने विचारले की, हे संबंध लग्नाच्या आधीचे होते का ? यावर रज्जाकने उत्तर दिले की, ‘हे सर्व संबंध सुरू झाले तेव्हा माझे लग्न झाले होते.’

अब्दुल रज्जाकचे नाव बाहुबली एक्ट्रेस तमन्ना भाटियाबरोबर देखील जोडले गेले होते. दोघांचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता. रज्जाकचे लग्न आएशा नावाच्या महिलेशी झाले असून, त्यांना दोन मुलं देखील आहेत.

18 वर्ष पाकिस्तानकडून क्रिकेट खेळताना, रज्जाकने 46 कसोटी सामने, 265 एकदिवसीय सामने आणि 32 टी20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रज्जाकने 8000 पेक्षा अधिक धावा व 389 विकेट घेतले आहेत. त्याने अखेरचा सामना 2013 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरूध्द खेळला होता.