अवश्य वाचा सामान्यांसह सेलिब्रिटींनाही वेड लावणाऱ्या फेसअॅपची हकीगत


Sarahah अॅप भारतात कधी काळी खूप लोकप्रिय झाले होते, सध्या त्याच प्रकारे फेसअॅप हे लोकप्रिय होत आहे. लोक आपल्या फोटोला या अॅपमधून म्हाताऱ्यापणीचा लूक देऊ शकतात. पण तुमच्या माहितीसाठी हे अॅप काही नवीन नाही. हे अॅप गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. पण सध्याच्या घडीला ते खूप लोकप्रिय होत आहे.

यासंदर्भात फेसअॅपनुसार आर्टिफिशिअल इंटेलिजंस टेक्नॉलजीचा वापर करून कंपनी फोटोंना म्हाताऱ्यापणीचा लूक देते. 2017 मध्ये हे अॅप लॉन्च झाले होते. याचा वापर करण्यात खूप मोठा धोका आहे? तुमच्या फोटो लायब्रेरीचे हे अॅप फूल अॅक्सेस घेते? अशाप्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात सध्या येत आहेत.

फक्त सामान्य नागरिकच नाही, तर अनेक सेलिब्रिटीज देखील हे अॅप वापरत असल्याने सध्या हे अॅप प्रचंड लोकप्रिय होत आहे. हे अॅप फोटोजला एडिट करण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर करते. न्यूरल नेटवर्क आर्टिफिशिअल इंटेलिजंसचाच एक प्रकार आहे. या अॅपमधून फक्त म्हातार लूकच नाही तर, यंग लूक, जेंडर चेंजसारखे प्रकार करता येतात.

तुम्ही जेव्हा आमची सर्विस युज करता, आमची सर्विस ऑटोमॅटिकली काही लॉग फाइल इनफॉर्मेशन रेकॉर्ड करते. यात तुमची वेब रिक्वेस्ट, आयपी अॅड्रेस, ब्राउजर टाइप, यूआरएल आणि या सर्विस सोबत तुम्ही कितीवेळेस इंटरॅक्ट करता. ही अशी माहिती यात सामील आहे.

पॉलिसीत हेदेखील सांगितले आहे की, कंपनी यूझर डेटा त्यांच्या परवानगीशिवाय विकणार नाही आणि रेंटवरही देणार नाही. पण फेस अॅपच्या ग्रुपच्या कंपन्याना तुमचा डेटा दिला जाऊ शकतो, कारण तुम्ही याला कॉन्सेंट दिले आहेत. कंपनीच्या पॉलिसीनुसार जर कंपनीला वाटले की, थर्ड पार्टी एडवार्टाइजिंग पार्टनर्सला काही माहिती दिली जाऊ शकते, तर ते देऊ शकतात. यात कूकीज डेटा सामिल आहे.

हे अॅपला व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर काही लोकांनी फोटो अपलोड होत असल्याचे सांगितले. पण सिक्योरिटी रिसर्चर रॉबर्ट बॅपटीस्टने सांगितले की, असे नाही आणि याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. पण हेदेखील खरे आहे की, जो फोटो तुम्ही वापरत आहात, त्याचा फूल अॅक्सेस तुम्ही कंपनीला देत आहात. सध्या या प्रायव्हसीच्या प्रश्नावर फेसअॅपकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Leave a Comment