मोबाईलच्या एका अ‍ॅपने कंट्रोल करता येणार मेंदू


जर तुम्हाला हॉलिवूडचा चित्रपट एक्स – मॅन आवडत असेल. तर तुम्ही प्रोफेस एक्सशी देखील परिचित असाल. प्रोफेसर एक्सकडे कोणच्याही मेंदूमध्ये काय चालले आहे ते वाचण्याची व त्याला कंट्रोल करण्याची ताकद असते. मात्र आता हीच गोष्ट सत्यात उतरणार असून, तीही केवळ एक वर्षांच्या आत. इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लाचे सीईओ आणि एयरोस्पेस स्टार्टअप स्पेस एक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी एक डिवाईस तयार केले आहे जे माणसांचा मेंदू वाचू शकते. खास गोष्ट म्हणजे हे डिवाईस लोकांच्या मेंदूमध्ये इंप्लांट केले जाऊ शकते आणि या डिवाईसला मोबाईल अपद्वारे कंट्रोल केले जाऊ शकते.

2017 मध्ये मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअप न्युरालिंक लॉच केले होते. न्युरालिंकद्वारे या डिवाईसची निर्मिती करण्यात आली आहे. एफडीएच्या मंजुरीनंतर 2020 पासून कंपनी मनुष्यावर याचे प्रशिक्षण करणार आहे.

कसे काम करणार हे डिवाईस ?
एन 1 प्रकारची एक चीप मनुष्याच्या डोक्यामध्ये इंप्लांट केली जाईल. हे डिवाईस कानाजवळ लावले जाईल. जे डोक्याच्या आतील भागातील चीपशी विना वायरीचे कनेक्ट असेल. या डिवाईसला एन 1 सेन्सॉर नावाच्या आयफोन अ‍ॅपने कंट्रोल केले जाईल. कानाजवळ डिवाईस अ‍ॅपला एका युएसबी पोर्टद्वारे कनेक्ट करावे लागेल. एन 1 चीप 96 पातळ तारांद्वारे डाटा ट्रांसफर करेल. सांगण्यात येत आहे की, प्रत्येक तारेची जाडी ही मनुष्याच्या केंसाच्या जाडी पेक्षाही कमी असेल. थोडक्यात हे डिवाईस आल्यानंतर आपला मेंदू सतत कंम्प्युटरशी जोडलेला असेल.

लकवाग्रस्त लोकांसाठी उपयोगी –
हे डिवाईस लकवाग्रस्त लोकांसाठी वरदान असणार आहे. जे लोक न्युरोलॉजिकल संबंधी आजाराने ग्रस्त आहेत अथवा मेंदूच्या आजारांनी जे त्रस्त आहेत अशा लोकांसाठी हे डिवाईस वरदान असेल. या डिवाईसमुळे अशा लोकांचे उपचार देखील करण्यात सोपे होईल. या डिवाईसचा वापर करण्यासाठी मनुष्याला डोक्यामध्ये 8 मिमीचे छिद्र करावे लागेल. ज्यामध्ये डिवाईस फिट करण्यात येईल. सध्या कंपनी या डिवाईसचे प्रशिक्षण उंदरांवर करत आहे. ज्यामुळे मशिन स्थिर आहे की नाही याबाबत माहिती मिळणार आहे. उंदरांवर हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मनुष्यावर याचे प्रशिक्षण केले जाणार आहे.

न्युरालिंकचे अध्यक्ष मॅक्स होदक यांनी सांगितले की, ‘आम्ही सुरूवातील या आयडियाशी सहमत नव्हतो. मात्र एलॉन मस्क यांनी सांगितल्यावर ते सहमत झाले.’ होदक म्हणाले की, ‘आपल्या त्वचेतून एखादी तार जावी आणि 2-3 वर्षात ती काढावी लागेल, असे आम्हाला नको आहे. आम्ही असा प्रयत्न करत आहोत की, जो खूप अधिक काळापर्यंत आणि व्यावहारिक असेल.’ एलॉन मस्क यांनी या प्रोजेक्टसाठी जगभरातील प्रसिध्द न्युरोलॉजिस्टला हायर केले आहे.

Leave a Comment