प्लॅस्टिकचा वापर थांबवण्यासाठी एअर न्युझीलँड झाडांपासून बनलेल्या कपात देणार चहा


जेट विमानाने एक माईलचे उड्डाण घेतल्यानंतर जवळपास 24 किलो कार्बन डायऑक्साइडचे निर्माण करते. हे तोपर्यंत कमी होणार नाही जोपर्यत एविएशन बायोफ्यूल योग्य मात्रामध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक एअरलाईंसनी कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहेत. आता एअर न्युझीलँड प्रवाशांना अशा कपामध्ये चहा अथवा कॉफी देणार आहे जो झाडांपासून बनलेला असेल.  यामुळे एअरलाईंस दरवर्षी प्लास्टिकपासून बनलेल्या 20 लाख वस्तू कमी करणार आहे.

एअर न्युझीलँड उड्डाणावेळी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकपासून बनलेल्या सर्व वस्तू बदलत आहे.  यामुळे विमान देखील हलके होणार आहे व इंधनाची देखील बचत होणार आहे. एअरलाईंसची ही यादी खुप मोठी आहे. या यादीत प्लॅस्टिकपासून बनलेले कप, पाण्याची बॉटल, सॉसचे पॉकेट आणि चीजचे ट्रे यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर थांबवल्याने एअरलाईंस दरवर्षी एक करोड पाउंड (46 लाख किलो) कार्बन डायऑक्साइड निर्माण होण्यापासून थांबवणार आहे.

एअर लाईंसच्या या धोरणामुळे प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांना विमानात विना पाण्याचा प्रवास करावा लागणार नाही.  विमानात या सर्व गोष्टी मिळणार आहेत मात्र थोड्या नवीन अंदाजात मिळतील. उदाहरण म्हणजे, सॉसच्या पॉकिटाऐवजी प्रवाशांना पुन्हा वापरता येतील अशा प्लेट अथवा वाटीमध्ये सॉस देण्यात येईल. एअरलाईनकडून दरवर्षी केवळ प्लॅस्टिकचे कपच 3 करोड वापरले जातात.

एअरलाईनने तेथील स्थानिक उड्डाणांसाठी या गोष्टींची अमंलबजावणी सुरू केली आहे.  एअर न्युझीलँडने 2018 मध्ये जवळपास 35 लाख टन कार्बन डायऑक्साइडची निर्मिती केली होती.

Leave a Comment