संपूर्ण भारताने पाहिले वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण


मुंबई- खंडग्रास चंद्रगहण भारतात बुधवारी काही तासांसाठी पाहायला मिळाले. बुधवारी रात्री १.३१ वाजता हे चंद्रग्रहण सुरू झाले आणि पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास संपले. २ तास ५८ मिनिटांच्या जवळपास या ग्रहणाचा एकूण कालावधी होता. हे चंद्रग्रहण तब्बल १४९ वर्षांनंतर दिसले आहे.

हे चंद्रग्रहण भारताच्या सर्व भागात पाहायला मिळाले. भारतासहीत अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच आशिया खंडातही हे चंद्रग्रहण पाहायला मिळाले. मुंबईतही हे चंद्रग्रहण पाहायला मिळाले. पृथ्वी जेव्हा सूर्य व चंद्राच्यामध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्र ग्रहणाचे सुंदर दृश्य जगातील काही भागात पाहायला मिळाले आहे. चंद्र ग्रहणाच्यावेळी चंद्र पूर्णपणे गडद झाला होता. चंद्र ग्रहणाच्या प्रत्येक तपशीलावर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. भारतात पुढील चंद्रग्रहण हे २६ मे २०२१ साली होईल. तेव्हा मात्र, पूर्ण चंद्र ग्रहण होईल.

Leave a Comment