निर्बंधानंतरही उत्तर कोरियाच्या किंग जोंगला मिळत आहेत लग्जरी गाड्या


उत्तर कोरियाबाबत जगामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.  यंदा हा वाद उत्तर कोरियाचे हुकुमशाह  किंग जोंग यांच्या लग्जरी गाड्यांबद्दल आहे. किंम जोंग ज्या गाड्या वापरतात त्यामध्ये मर्सिडीज-बेंज मेबँक एस 600 पुलमॅन गार्ड आणि मेबँक एस 62 यांचा समावेश आहे. जगातील अनेक नेत्यांना आवडणाऱ्या या गाडीची किंमत 16 लाख डॉलर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिकेने निर्बंध घातले असताना देखील किंम जोंग या गाडीचा वापर करत आहेत. निर्बंधानुसार लग्जरी सामानांना उत्तर कोरियामध्ये बंदी आहे.

14 जून 2018 ला दोन मर्सिडीज मेबँक एस 600 यागाड्या उत्तर कोरियामध्ये आणण्यात आल्या आहेत. रॉटरडॅमच्या बंदरावर या गाड्या आणण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर अॅडवांस डिफेंस स्टडीच्या रिपोर्टनुसार, सहा देशांचा हजारो किलोमीटरचा प्रवास करून या गाड्यांना प्योगंयांग येथे आणण्यात येते. चीन, जापान,   दक्षिण कोरिया, रशिया देशांमध्ये पाच लाख डॉलरच्या किंमतीत मिळणाऱ्या या गाड्या प्योगंयांग येथे पोहचतात.

रिपोर्टनुसार, पश्चिमी देशांमधील सामान बंदराच्यामार्फत उत्तर कोरियातील लोकांपर्यंत पोहचते. अमेरिकेने उत्तर कोरियाने परमाणू प्रशिक्षण बंद करावे यासाठी निर्बंध घातले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि किंम जोंग यांच्यामध्ये तीन वेळा भेट झाल्यानंतर देखील निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. हनोई येथील शिखर संंम्मेलनामध्ये देखील किंम जोंग यांनी निर्बंध हटवण्याची मागणी केली होती. हे निर्बंध 2016 पासून वाढवण्यात आले आहेत.

माजी अमेरिकी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांच्या काळात अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंध घातले होते. जेणेकरून कोणतेही लग्जरी सामान तेथे पोहचणार नाही. मात्र रिपोर्टनुसार, 2015 ते 2017 दरम्यान 90 देशांनी उत्तर कोरियातील लोकांना लग्जरी सामान पाठवले आहे. काही दिवसांपुर्वीच चीनचे राष्ट्रपीत शी जिनपिंग आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन प्योगंयांगमध्ये दौऱ्यावर असताना मर्सिडीजमध्ये किंम जोग यांच्याबरोबर प्रवास करताना दिसले होते.

Leave a Comment