कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताचा मोठा विजय


पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या प्र प्रकरणात भारताचा मोठा विजय झाला आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसइंने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर भारताच्या बाजूने निर्णय देत त्यांना काउंसलर एक्सेस देण्यास देखील सांगितले आहे. याआधी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

कोर्टाच्या या निर्णयावर पाकिस्तानने विरोध दर्शवला मात्र आयसीजीने मान्य केले नाही.

कोर्ट म्हणाले की, पाकिस्तानने फाशीच्या शिक्षेवर पुन्हा विचार करावा. नेदरलँडच्या द हेग येथील पीस पॅलेसमध्ये सार्वजनिक सुनवाई झाली. कोर्टात प्रमुख न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी निर्णय वाचून दाखवला. 16 पैकी 15 न्यायाधीश हे भारताच्या बाजूने होते. याशिवाय पाकिस्तानने व्हिएन्ना करारेचे उल्लंघन केले असल्याचे देखील कोर्टाने म्हटले आहे.

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले. तसेच भारताचे वकिल हरिश साळवे यांचे आभार मानले. याआधी देखील आयसीजेने पाकिस्तानला 18 मे 2017 जाधव यांना फाशी देण्यापासून रोखले होते.

Leave a Comment