बिल गेट्सना मागे टाकत बर्नार्ड अरनॉल्ट बनले जगात सर्वात श्रीमंत


लग्जरी गुड्स कंपनी एलवीएमएमचचे चेअरमन बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रींमत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्समध्ये मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स हे तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. एलवीएमएचच्या शेअरमध्ये 1.38 टक्के तेजी आल्याने अरनॉल्ट यांची नेटवर्थ मंगळवारी 108 अरब डॉलर (7.45 लाख करोड रूपये) झाली. बिल गेट्स यांची संपत्ती 107 अरब करोड (7.38 लाख करोड रूपये) आहे.

ब्लुमबर्ग बिलिनियर इंडेक्समध्ये सात वर्षात पहिल्यांदाच बिल गेट्स तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. यामध्ये समावेश असलेल्या 500 श्रीमतांची संपत्ती दररोज अमेरिकन शेअर बाजार बंद झाल्यानंतर अपडेट केली जाते. इंडेक्समध्ये सहभागी अरबपतींमध्ये अरनॉल्ट यांच्या संपत्तीमध्ये यावर्षी सर्वाधिक 39 अरब डॉलर वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती फ्रांसच्या जीडीपीच्या 3 टक्के एवढी आहे.

अरनॉल्ट मागील महिन्यात सेंटीबिलिनियर (100 अरब डॉलर) क्लबमध्ये सहभागी झाले होते. जगामध्ये असे केवळ तीनच व्यक्ती आहेत. बेझॉस, गेट्स आणि अरनॉल्ट यांची संपत्ती अमेरिकन शेअर बाजारातील एसएंडपी 500 इंडेक्समध्ये सहभागी कंपन्यांपेक्षा अधिक आहे. वॉलमार्ट, एक्सॉन मोबिल कार्प आणि वॉल्ट डिजनी सारख्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.

अरनॉल्ट यांच्याकडे एलवीएमएच कंपनीचे 50 टक्के शेअर आहेत. 1988 मध्ये त्यांनी कंट्रोलिंग हिस्सेदारी विकत घेतली होती. त्यांच्याजवळ फॅशन हाऊस  क्रिश्चियन डायरचे देखील 97 टक्के शेअर आहेत. बिल गेट्स आणि बेझॉस यांच्या प्रमाणेच अरनॉल्ट मोठ्या प्रमाणात देणगी देतात. आग लागल्याने नष्ट झालेल्या नोट्रे डेम कॅथेड्रेल चर्चला बनवण्यासाठी त्यांनी 65 करोड डॉलरची मदत दिली होती.

बिल गेट्स यांनी आतापर्यंत 35 अरब डॉलर दान केले आहेत. नाहीतर ते आजही सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. तसेच जेफ बेझॉस यांचा घटस्फोट झाल्यानंतर 36.5 अरब डॉलर त्यांना पत्नीला द्यावे लागले होते. तरी देखील श्रीमंताच्या यादीत ते सर्वोच्च स्थानावर आहेत.

जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती – 

व्यक्ती                                  संपत्ती (रूपये)

जेफ बेझॉस (अमझोन) – 8.62 लाख करोड

बर्नार्ड अरनॉल्ट ( एलवीएमएम) – 7.45 लाख करोड

बिल गेट्स ( मायक्रोसॉफ्ट ) – 7.38 लाख करोड

वॉरेन बफे (बर्कशायर हॅथवे) –  5.79 लाख करोड

मार्क झकरबर्क (फेसबूक) – 5.48 लाख करोड

Leave a Comment