आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर


पर्थ – इंग्लंड आणि वेल्समध्ये नुकतीच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडली. यावेळी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने सुपर ओव्हरच्या नियमावलीच्या आधारे न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद मिळवले. आयसीसीने या स्पर्धा संपल्याच्या काही तासानंतर 2020 साली होणाऱ्या सातव्या टी20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार असून पाच आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेचा थरार 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या काळात रंगणार आहे. सुपर12 संघांची घोषणा आयसीसीने केली असून यामध्ये पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या आठ संघाचा समावेश आहे. तर 2019 मध्ये होणाऱ्या पात्रता फेरीतून ‘टॉप’चे 4 संघ निवडले जाणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या स्पर्धेत गतविजेते आणि तीन वेळा उपविजेत्याचा मान मिळालेल्या श्रीलंकेला साखळी सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तसेच बांगलादेश संघालाही साखळी सामन्यात प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांना कमी गुणांमुळे टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर12 संघात स्थान मिळाले नसल्यामुळे त्यांना 12 संघात स्थान मिळवण्यासाठी ग्रुप स्टेजमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.

आयसीसीने ठरवलेले ग्रुप –
ग्रुप 1 – पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ग्रुप अ विजेता, ग्रुप ब उप-विजेता
ग्रुप 2 – भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ग्रुप अ उप-विजेता, ग्रुप ब विजेता
भारताचे सामने असे असतील –
ऑक्टोबर 24- भारत vs दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर 29 – भारत vs क्वालिफायर ए-२ (मेलबर्न क्रिकेट मैदान)
नोव्हेंबर 1- भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट मैदान)
नोव्हेंबर 1 – भारत vs क्वालिफायर बी1 (अॅडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 8 – भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट मैदान
)टी 20 स्पर्धेचे सेमीफायनल सामने –
नोव्हेंबर 11 – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट मैदान)
नोव्हेंबर 12 – दुसरी सेमीफाइनल (एडिलेड ओव्हल)
आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 15 नोव्हेंबरला मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाईल.

कोणत्या संघात होणार पात्रता फेरी – श्रीलंका, बांग्लादेश, स्कॉटलँड, झिब्बांबे, नेदरलँड, हाँगकाँग, ओमान, आर्यंलंड आणि संयुक्त अरब अमिरात, नेपाळ या संघामध्ये पात्रता फेरी खेळवण्यात येणार आहे. यातून पहिले टॉपचे चार संघ अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरतील.