बेन स्टोक्स बनणार सर बेन स्टोक्स


नुकत्याच पार पडलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड नवा चँपियन ठरला असताना इंग्लंडच्या यशात महत्वाचे योगदान दिलेला बेन स्टोक्स याला नाईटहूड पदवी दिली जाणार असल्याचे समजते. यामुळे बेन स्टोक्स यापुढे सर बेन स्टोक्स बनेल.

ब्रिटनच्या आजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या नंतर पंतप्रधान रेस मध्ये आघाडीवर असलेले बोरिस जोन्सन आणि जेरेमी हंट यांनी द सन आणि टॉक रेडीओकडून विचारल्या गेलेल्या स्टोक्स नाईटहूड पदवीचा हक्कदार आहे का या प्रश्नांना एका शब्दात उत्तर देताना हो असे उत्तर दिले आहे. स्टोक्सने अंतिम लढतीत ९८ चेंडूत नाबाद ८४ धावा काढल्या आणि लॉर्डसवर सामना टाय मध्ये नेला. त्यानंतर सुपरओव्हर मध्येही त्याने ८ रन्स काढल्या त्यामुळे सामना पुन्हा टाय झाला. शेवटी अधिक चौकार मारणारा संघ म्हणून इंग्लंडला विजयी घोषित केले गेले.

इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत ११ क्रिकेट खेळाडूना नाईटहूड खिताबाने गौरविले गेले आहे. त्यात इंग्लंडचा माजी कप्तान एलिस्टेअर कुक शेवटचा खेळाडू आहे. त्यानंतर आता हा मान बेन स्टोक्सला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment