इस्रायलमध्ये सापडली ९००० वर्षापूर्वीची वस्ती


अतिशय निर्जन मानल्या जाणाऱ्या इस्रायलच्या एका भागात चक्क ९ हजार वर्षापूर्वीची वस्ती सापडली आहे. पश्चिम जेरुसलेमपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर मोत्झा जंक्शनच्या जवळ ही वस्ती सापडली असून पुरातत्व विभागातील तज्ञ विद्वानांच्या मते येतथे किमान ३ हजार लोक राहत असावेत.


जमिनीखाली हे गाव दाबले गेले होते. जमीन उकरली तेव्हा येथे मोठ्या इमारतींचे अवशेष, खोल्या, सार्वजनिक सुविधा, गल्ल्या, हजारो उपकरणे, दागिने, मूर्ती, बी बियाणी अश्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. चमकदार दगड, लढाई किंवा शिकारीसाठी वापरले जाणारे दगडी बाण आणि अनेक दगडी वस्तूंचा त्यात समावेश आहे. कदाचित या वस्तू प्रेतांबरोबर दफन केल्या जात असाव्यात असा अंदाज वर्तविला जात आहे.


हातात घालता येतील अशी अनेक लहान मोठी दगडी कडी, ज्वालामुखी पासून बनलेले खास दगड येथे आढळले आहेत. ही वस्ती नवपाषाण युगातील असावी असा तर्क आहे. अधिक संशोधन केले जात आहे.

Leave a Comment