रेडमी के २० प्रो खास एडिशन, किंमत ४.८० लाख रुपये


शाओमी त्यांचा रेडमी के २० प्रो भारतात १७ जुलै रोजी सादर करत असल्याचे जाहीर करण्यात आले असतानाच काही तास अगोदर कंपनीने ट्विटरवर रेडमी के २० प्रो चे स्पेशल व्हर्जन याच दिवशी लाँच केले जात असल्याची माहिती दिली आहे. ट्विटरवर या स्पेशल व्हर्जनचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यात फोनचे बॅक पॅनल सोन्याचे दिसत असून यात हिरेही वापरले गेले आहेत. या फोनची किंमत ४ लाख ८० हजार आहे.

लाँचिंग पूर्वी ट्विटरवर रेडमी के २० प्रो च्या के अल्फाबेट लोगोवर हिरे जडविलेले दिसत आहेत. शाओमीचे भारतातील प्रमुख मनुकुमार जैन यांनी ट्विट करून आउट ऑफ द वर्ल्ड, व्हेरी स्पेशल व्हर्जन, होल्ड युअर ब्रीद असा संदेश दिला होता. या फोनची विक्री अन्य फोनप्रमाणे होणार कि तो फक्त शोकेस साठी आहे याचा खुलासा केला गेलेला नाही.

के २० प्रो मध्ये ६.३९ इंची सुपर एमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले गोरील्ला ग्लास ५ सह दिला गेला आहे. ड्युअल नॅनो सिम, स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर, ६ व ८ जीबी रॅम आणि ६४, १२८, २५६ जीबी स्टोरेज, एआय ट्रिपल कॅमेरा सेट ( ४८+८+१३ एमपी) आणि २० एमपीचा पॉपअप सेल्फी कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर आहेत.

Leave a Comment