या गावात राहते एकच व्यक्ती, पण ती नाही एकटी


रशियन सीमेवरील दोब रुसा हे गाव ३० वर्षापूर्वी चांगले नांदते गाजते होते. त्यावेळी या गावात २०० लोक राहत असत पण सोव्हिएत रशियाची छकले झाली आणि या गावातील लोकांनी अन्य शहरात स्थलांतर केले. अर्थात सगळेच गाव सोडून गेले नव्हते. त्यातील एक आहे गरीसा मुण्तेन. तो आजही याच गावात आहे आणि गावात तो एकच माणूस आहे पण तो एकटा मात्र नाही.


गरीसा सांगतो, काही वर्षापर्यत त्याच्या सोबतीला जेना व लिडा हे जोडपे होते. ते जवळ राहत नव्हते तरी कधीमधी भेटत असत किंवा फोनवरून बोलत असत. काही दिवसांपूर्वी त्यांची हत्त्या झाली तेव्हापासून गरीसा एकच माणूस राहिला आहे. पण त्याला सोबत आहे ती ५ कुत्री, ९ टर्की पक्षी, २ मांजरे, ४२ कोंबड्या, १२० बदके, ५० कबुतरे आणि हजारो मधमाश्यांची. तो म्हणतो हे सारे जीव माझे सोबती आहेत. गावात ५० घरे आहेत पण त्यात राहायला कुणी नाही.

गरीसाने एकटेपणा दूर करण्यासाठी वेगळा मार्ग शोधला आहे. शेतात काम करताना तो झाडे, पक्षी, प्राण्यांशी गप्पा मारतो. गरीसा ६५ वर्षांचा आहे आणि याच पद्धतीने तो आपले आयुष्य जगणार आहे.