द्वितीय विश्वयुद्धातील सैनिकाने स्काई डायविंग करत साजरा केला 100वा वाढदिवस


द्वितीय विश्वयुद्धातील सैनिक थॉमस हॉजसन यांनी 74 वर्षांनी विमानातुन उडी मारत स्काई डायविंगचा अनुभव घेत 100 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी 14 फुट उंचावरून स्काई डायवर मारली. थॉमस यांनी याचबरोबर दोन चॅरिटीसाठी रक्कम देखील जमा  केली.

कुम्बरिया काउंटी येथील क्लेटर गावात राहणाऱ्या थॉमस यांचा जन्म 30 जून 1919 ला झाला आहे. या वर्षी वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना स्काई डायविंग करायची होती. मात्र खराब वातावरणामुळे एक हप्त्यानंतर स्काई डायविंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्वितीय विश्व युद्ध सुरू झाल्यावर 19 वर्षांचे थॉमस रॉयल इंजिनियर्स युनिटमध्ये भर्ती झाले होते. हे ब्रिटिश सैनिकांचे युनिट आहे. या युनिटचे सैनिक रस्ते आणि पुल बनवण्याचे काम करतात. येथे थॉमस यांना पैराट्रुपर्सच्या ट्रेनिंग टीममध्ये सामिल करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी 74 वर्षापुर्वी विमानातुन उडी मारली होती.

थॉमस यांनी कॅन्सर रिसर्च युके आणि द ग्रेट नॉर्थ एअर अॅम्बुंल्स चॅरिटी साठी रक्कम जमा केली. स्काई डायविंगनंतर ते म्हणाले की, ‘मी किती इन्जॉय केले ते शब्दात सांगणे कठिण आहे. यामुळे माझ्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. मात्र मी त्याबद्दल बोलू शकत नाही. मला अनेक दिवसांपासून स्काई डायविंग करायचे होते. हेच माझे अखेरचे स्वप्न होते. मी तरूण असल्याचे मला आता वाटत आहे.

मला 75 बर्थडे कार्ड मिळाले आहेत. यामध्ये राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या कार्डचा देखील समावेश आहे. मला गिफ्टस नको आहेत. मला डोनेशन हवे आहे. जेणेकरून मी चॅरिटीला मदत करू शकेल. या वयात देखील मला एडवेंजर आवडते. मी आजही स्वतः कार चालवत मित्रांना भेटायला जातो’, असे थॉमस यांनी सांगितले.

Leave a Comment