#SareeTwitter ट्विटरवर ट्रेडिंग, महिलांनी शेअर केले साडीतील फोटो


सोमवारी ट्विटरवर #SareeTwitter हे ट्रेडिंग पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. मात्र मंगळवारी याच हॅशटॅगचा वापर करून अनेकांनी आपले साडेतील फोटो शेअर केले आहेत. #SareeTwitter या हॅशटॅग खाली ट्विट केलेल्या साडीतील फोटोंचा ट्विटरवर अक्षरशः पाऊसच पडला आहे.

अनेक महिला नेत्या व अभिनेत्री यांनीही याध्ये सहभागी होत #SareeTwitter  हॅशटॅगसह आपले साडीतील फोटो शेअर केले.

शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एक नाही तर तब्बल चार साडीतील फोटो शेअर करत, साडीवरील प्रेम दाखवले आहे.

भाजप नेत्या नुपुर शर्मा यांनी देखील ट्विट करत साडीतील फोटो शेअर केला.

अभिनेत्री-राजकीय नेत्या नगमा यांनी सुंदर पिवळ्या साडीतील फोटो शेअर केला.

अनेकांनी हॅशटॅगचा वापर करत साडीतील फोटो शेअर केले.

तुम्ही केला का नाही तुमचा साडीतील फोटो ट्विट ?  नसेल केला  तर नक्की करा.