रशियामध्ये 2620 लोकांनी ‘मानवी सायकल’ बनवण्याचा केला विश्वविक्रम


रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रविवारी नाइट सायक्लिंग फेस्टिवल साजरा करण्यात आला. यामध्ये शहरातील 15 हजारांपेक्षा अधिक सायक्लिस्टने सहभाग घेतला होता. लोकांना एक दिवस वाहन सोडून सायकल चालवण्याची प्रेरणा देण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी होणाऱ्या या फेस्टिवलमध्ये 2620 लोकांनी सहभागी होत मानवी सायकल बनवत विश्वविक्रम केला आहे.

या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. गिनीज बुकनुसार, रशियाने हा विक्रम करत ब्रिटनचा दोन वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला आहे.  ब्रिटनमध्ये 6 जून 2017 ला 1148 लोकांनी हा विक्रम केला होता.

मॉस्कोचे उपमहापौर मॅक्सिम लिक्सुटोव यांनी सांगितले की, नाइट सायक्लिंगची सुरूवात फ्रेमलिन जवळील वासिलिव्स्कीच्या उतारापासून झाली. या फेस्टिवलमध्ये 15000 हजार लोकांनी भाग घेतला होता. तसेच मॉस्कोमध्ये परिवहन दिनी राजधानीमधील परिवहन क्षेत्रातील कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment