लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या ट्युरिंग यांचा नोटांवर दिसणार फोटो


ब्रिटनचे महान गणितज्ञ आणि कोड-ब्रेकर एलन ट्युरिंग यांनी द्वितीय विश्वयुद्धादरम्यान जर्मनीतुन नाझींकडून पाठवण्यात आलेला एनिग्मा कोड (सांकेतिक माहिती) ब्रेक केला होता. हा कोड ब्रेक केल्याने लाखो लोकांचे प्राण वाचले होते.

आता ब्रिटनच्या सरकारने निर्णय घेतला आहे की, 50 पाउंडच्या नोटांवर एलन ट्युरिंग यांचा फोटा छापण्यात येणार आहे. बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कार्ने यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. कार्ने यांनी सांगितले की, ट्युरिंग हे कंम्प्युटर सायंस आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे जनक असल्याबरोबरच ते एक ‘वॉर हिरो’ देखील आहेत.

ट्युरिंग यांनी एनिग्मा कोड तोडत ब्रिटनमधील लाखो लोकांचे प्राण वाचवले होते. या कोडचा वापर जर्मन सैनिक युद्धाच्या दरम्यान गौपनीय संदेशांचे कोडिंग करण्यासाठी करत असे. 1930 मध्ये ट्युरिंग यांनी युनिर्वल मशीनची संकल्पना मांडली होती. ही मशीन कोणत्याही संगणकीय समस्येवर समाधान शोधू शकत होती.

ट्युरिंग यांना धावण्यास आवडत असे. सांगण्यात येते की, प्रथम विश्व युद्धादरम्यान ते अनेक बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ब्लेशले ते लंडन हे 64 किलोमीटर अंतर धावत पुर्ण करत असे. याशिवाय ते समलैंगिक असल्याने अनेक लोकांना ते आवडत नसे.

त्याकाळी समलैंगिक असणे गुन्हा समजले जाई. त्यांना विक्टोरियन कायद्यांतर्गत दोषी ठरवले गेले होते. त्यांच्या आयुष्यावर ‘ब्रेकिंग द कोड’ आणि ‘द इमिटेशन गेम’ हे दोन चित्रपट देखील आले आहेत. 1954 मध्ये विषामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment