रिअलमी एक्स सोबत स्पायडरमॅन एडिशन लाँच


रियलमीने त्यांचा पहिला पॉप अप सेल्फी कॅमेरा असलेला रिअलमी एक्स भारतात लाँच केला असून त्यासोबत रिअलमी मास्टर एडिशन आणि रिअलमी स्पायडरमॅन स्पेशल एडिशन फोन लाँच केले आहेत. हे सर्व फोन रिअलमी ३ आय प्रमाणे फ्लिपकार्टवर २४ जुलै पासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. मात्र त्याअगोदर १८ जुलै रोजी हेट टू वेट सेलचे आयोजन केले जात आहे.


रिअलमी स्पायडरमॅन स्पेशल एडिशन मध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असे एकाच व्हर्जन आहे. त्यात स्पायडरमॅन थीम्स आणि आयकॉन आहेत आणि त्याची किंमत २०९९९ रुपये आहे. मास्टर एडिशन ओनियन आणि गार्लिक अश्या दोन रंगात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे. रिअलमी एक्स साठी ६.३ इंची फुल एचडी एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. तो ४ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे.

रिअलमी एक्सचे गेमिंग फीचर्स अधिक चांगले आहेत. त्याला फ्रंटला १६ एमपीचा एआय लेन्सचा सेल्फी पॉपअप कॅमेरा दिला गेला आहे तसेच रिअरला ४८ एमपी आणि ५ एमपीचे दोन कॅमेरे आहेत. फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. अँड्राईड ९ पाय ओएस असून ४ जीबी साठी १६९९९ तर ८ जीबी साठी १९९९९ रुपये किमत आहे.

Leave a Comment