भारतातील लोकांना वाटत आहे स्मार्ट फोनची भिती


भारतात जवळपास 85 टक्के लोक स्मार्ट फोन वापरतात. यातील अनेक जणांचे म्हणणे आहे की, स्मार्ट फोन त्यांची जासूसी करत आहे. त्याचबरोबर त्यांची खासगी माहिती सुरक्षित नसल्याचे देखील अनेकांचे म्हणणे आहे. अनेक भारतीयांचे म्हणणे आहे की, वाय-फाय राउटर देखील त्यांची जासूसी करत आहे. काही दिवसांपुर्वीच एक रिपोर्ट समोर आला होता. त्यानुसार गुगलची आर्टिफिशियल इंटेलीजेंसची वॉयस असिस्टेंट सर्विस, गुगल असिस्टेंट सर्विस लोकांचे खासगी संभाषण रेकॉर्ड करत आहे.

स्मार्ट फोन बनतोय जासूस –
इंटरनेटवर आधारित बाजाराची माहिती आणि डाटा एनालिटीक ‘युगव’ने जाहीर केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये खुलासा केला आहे की, 52 टक्के भारतीयांना वाटते की, इंटरनेटवर आधारित गॅजेट्स, स्मार्ट फोन त्यांच्या खासगी गोष्टींना रेकॉर्ड करत आहे.

तसेच, अनेक लोकांचे असे देखील म्हणणे आहे की, इंटरनेटशी संबंधित गॅजेट देखील त्यांची जासूसी करतात. मात्र ते वापरणाऱ्यांची संख्या जास्त नाही. सिक्युरिटी कॅमेऱ्यासंबंधी 1045 लोकांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात खुलासा झाला की, केवळ 14 टक्के लोकच याचा वापर करतात. सर्वेमध्ये सहभागी 15 टक्के लोकच स्मार्ट वॉयस असिस्टेंट डिवाईसचा वापर करतात. तर 21 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

वाय-फाय राउटरद्वारे देखील जासूसी –
युगवच्या सर्वेनुसार 85 टक्के लोक ऑनलाईन प्राव्हेसीबद्दल चिंतित आहेत. यामधील 54 टक्के लोकांना वाटते की, स्मार्टफोन त्यांची जासूसी करत असून, त्यांची खासगी माहिती सुरक्षित नाही. तसेच, 33 टक्के लोकांना वाटते की, इंटरनेटशी जोडलेला कंम्प्युटरमध्ये त्यांची माहिती सुरक्षित नाही. तर 25 टक्के लोकांना वाटते की, वाय-फाय राउटर देखील त्यांची जासूसी करत आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, 55 टक्के लोकांना कंम्प्युटरमध्ये असलेले फोटो, ई-मेल, आर्थिक माहिती जाण्याची अधिक भिती आहे. तर 53 टक्के लोकांना सायबर आतंकवाद हा सर्वात मोठा धोका असल्याचे वाटते.

सर्वेक्षणामध्ये आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. 53 टक्के लोक महत्त्वाचा फाइल्स आणि फोटोच्या गोपनियतेसाठी डिवाईसला पासवर्ड ठेवतात. तर 48 टक्के लोक वारंवार अपडेट आणि एंटी व्हायरसचा उपयोग करतात. 42 टक्के युजर्स पब्लिक वाय-फायचा वापर करणे टाळतात. 41 टक्के लोक थर्ड पार्टी अप म्हणजेच माहित नसलेला अ‍ॅप डाऊनलोड करणे टाळतात. तर 40 टक्के लोक अ‍ॅपच्या परवानगीला नियंत्रणात ठेवणे योग्य असल्याचे समजतात.

याशिवाय वेबकॅमला देखील लोक संशयाच्या दृष्टीने बघतात. सर्वेक्षणामध्ये समोर आले की, महिला वेबकॅमच्या काम नसतात, वेबकॅमला कापडाने झाकून टाकतात. तसेच ऑनलाईन फ्रॉड टाळण्यासाठी फोन बँकिंगचा वापर करणे टाळतात. तर पुरूष इनकॉग्निटो मोडवर इंटरनेट वापरतात. याशिवाय प्राव्हेसी टिकवण्यासाठी वीपीएन नेटवर्कचा वापर करतात.

गुगल रेकॉर्ड करते संभाषण –
गुगलने देखील मान्य केले आहे की, आर्टिफिशियल इंटेलीजेंस वॉयस असिस्टेंट सर्विस गूगल असिस्टेंटच्या मार्फत युजर्सचे संभाषण रेकॉर्ड केले जात आहे. काही दिवसांपुर्वी डच भाषेमधील गुगल असिस्टेंटची काही रेकॉर्डिंग्स बेल्झियमच्या पब्लिक ब्रॉडकास्टर वीआरटीवर लिक झाल्या होत्या. वीआरटीने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, यातील काही रेकॉर्डिंग्स या जाणूनबुजून रेकॉर्ड करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय गुगल संवेदनशील आणि खासगी संभाषण देखील ऐकते.

Leave a Comment