आता रॅप साँग गाणार नवाजुद्दीन सिद्दीकी


आपल्या अभिनयाची अवघ्या बॉलीवूडला दाखल घ्यायला लावणार हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीक लवकरच आता आपल्यासमोर गायक म्हणून देखील येणार आहे. तो इतर कोणत्या चित्रपटासाठी नाहीतर त्याच्या आगामी चित्रपटासाठी गाणे गाणार आहे.


नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच त्याचा आगामी ‘बोले चुडिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘स्वॅगी चुडिया’ या रॅप साँगला तो आवाज देणार असल्याची माहिती ट्विट करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. त्यामुळे नवाजच्या चाहत्यांना आता त्याच्या अभिनयासोबत आवाजाचीही जादू अनुभवायला मिळणार आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘बोले चुडिया’ या चित्रपटात नवाजच्या अपोझिट झळकणार आहे. या चित्रपटात सुरूवातीला मौनी रॉयची वर्णी लागली होती. पण चित्रपटातून तिचा पत्ता काही कारणांमुळे कट करण्यात आला. ज्यानंतर याठिकाणी तमन्नाची वर्णी लागली. दरम्यान नवाजुद्दीनचा भाऊ शम्स नवाज सिद्दीकी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून राजेश आणि किरण भाटिया यांची निर्मिती असणार आहे.

Leave a Comment