अभिनेता जॅकी चॅनच्या नवीन ‘सुपरयाट’ची किंमत आहे तब्बल 315 कोटी


चीनच्या जिंगलाँगमध्ये शनिवारी मार्शल आर्ट अभिनेता जॅकी चॅनच्या ‘सुपरयाट’ला 240 चाकांच्या ट्रकने बंदरावर आणण्यात आले. बंदरावर जॅकी चॅनच्या उपस्थितीत सुपरयाटला समुद्रात उतरवण्यात आले. या सुपरयाटला नेदरलँडच्या कंपनीने बनवले असून, यामध्ये एमटीयू 16 वी 2000 एम 84 चे दोन डिझेल इंजीन आहेत. हे त्याला 44 किलोमीटर प्रती तासाचा वेग देतात.

डच कंपनी  नेवल आर्किटेक्चरनुसार, याला बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. याची लांबी 46.5 मीटर आणि उंची 22 मीटर आहे. जिगलाँगच्या यॉट इंडस्ट्री पार्कमध्ये याला बनवण्यात आले असून, यासाठी 2017 मध्ये ऑर्डर करण्यात आली होती.

ही याट 44 किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने समुद्रात चालेल. याची किंमत 46 मिलियन डॉलर ( 315 करोड रुपये) आहे. याला बनवणारी डच कंपनीने  याआधी, सनराइजर्स, बॅग्लिट्टो, हीसेन आणि बेनेटी सारख्या कंपन्यांसाठी सुपरयाट बनवल्या आहेत. या फर्मला याटच्या आतील व बाहेरील डिझाईनचे काम सोपवण्यात आले होते.

Leave a Comment