आनंद कुमारांच्या जिल्ह्यामधील प्रेक्षकांनी ‘सुपर ३०’कडे फिरवली पाठ


मागील आठवड्यात बॉक्स ऑफिसवर गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात कोणताही आधार नसलेली मुलेदेखील देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.


या चित्रपटाचे अद्यापपर्यंतचे कमाईचे आकडेही समोर आले आहेत. तीन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ५० कोटींची कमाई केली आहे. नुकतेच समोर आलेल्या अहवालानुसार सर्वाधिक प्रतिसाद या चित्रपटाला मुंबईतून मिळाला असून या चित्रपटाने मुंबईत पहिल्या दिवशी ३.७१ तर दुसऱ्या दिवशी ५.७९ कोटींची कमाई केली आहे. या विशेष म्हणजे या चित्रपटाला आनंद कुमारांच्या स्वतःच्या राज्यातच सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बिहारमध्ये पहिल्या दिवशी केवळ ०.३८ तर दुसऱ्या दिवशी ०.४९ लाखांची कमाई केली आहे.

मुंबईपाठोपाठ, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, म्हैसूर आणि त्यानंतर बिहार राज्याचा क्रमांक आहे. दरम्यान विकास बहलने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची कथा संजीव दत्त यांनी लिहिली आहे. ऋतिकशिवाय चित्रपटात मृणाल ठाकूर, विरेंद्र सक्सेना, पंकज त्रिपाठी आणि आदित्य श्रीवास्तव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Comment