जर्मनीत शीख दुचाकी चालकांना हेल्मेट बंधनकारक


शीख समुदाय पगडी बांधतो आणि त्यामुळे अनेक देशात दुचाकी वाहन चालविताना त्यांना हेल्मेट न वापरण्याची सवलत आहे. भारत, युके, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा या देशात शीख समुदायाला अशी सवलत दिली गेली असली तर जर्मनी मध्ये मात्र शीख दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट बंधनकारक केले गेले आहे. जर्मनीतील सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल दिला आहे.

मामला २०१३ मधला आहे. त्यावेळी जर्मनीच्या दक्षिण भागात एक शीख व्यक्ती पगडी घालून दुचाकी चालवीत होती तेव्ह्या त्याचे चलन बनविले गेले. त्याने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्याचा निकाल आता दिला गेला आहे. या निकालात असे म्हटले गेले आहे, हेल्मेटचे दुचाकी चालकाच्या संरक्षणासाठी आहेच पण अन्य लोकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा आहे. कारण हेल्मेट न घातल्याने एखाद्याला गंभीर अपघात झाला तर ते पाहून दुसऱ्यांना धक्का बसू शकतो. ही बाब दुसऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेशी निगडीत आहे म्हणून शीख लोकांनी सुद्धा हेल्मेट वापरलेच पाहिजे.

Leave a Comment