यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही कपिल देवचे रेकॉर्ड अबाधित


रविवारी इंग्लंडने चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडचा पराभव करून आयसीसी वर्ल्ड कप २०१९ वर त्यांचे नाव कोरले. या निमित्ताने इंग्लंड टीम नवी चँपीयन टीम ठरली. या स्पर्धेत अनेक नवी रेकॉर्ड बनली अनेक जुनी रेकॉर्डस मोडली गेली मात्र माजी भारतीय कप्तान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचे रेकॉर्ड अद्यापि अबाधित राहिले असून आता ते २०२३च्या वर्ल्ड कप मध्ये तरी मोडले जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण २०२३ मध्ये सुद्धा हे रेकॉर्ड मोडणे अवघड असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

१९८३ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा प्रथमच वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. संघाची धुरा कपिल देव यांच्या खांद्यावर होती. भारताने जिद्दीने खेळून हा कप जिंकला तेव्हा कपिल देव यांचे वय होते अवघे २४ वर्षे १७० दिवस. इतक्या लहान वयात जगातील कोणत्याही देशाच्या क्रिकेट टीमचा कप्तान वर्ल्ड कप जिंकु शकलेला नाही. त्यामुळे कपिल देव यांच्या नावावर असलेले हे रेकॉर्ड ३६ वर्षे उलटूनही अजूनतरी कायम आहे.

कपिल देव यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग याचा नंबर येतो. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्याचे वय होते २८ वर्षे ९४ दिवस. न्यूझीलंडचा केन विलियम्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप न्युझीलंडने जिंकला तेव्हा तो २८ वर्षे ३४० दिवस वयाचा होता.

धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये टीम इंडियाने दुसऱ्यावेळी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा धोनीचे व २९ वर्षे २६९ दिवस होते. पुढचा वर्ल्ड कप भारतात २०२३ मध्ये होणार आहे. त्यावेळी कपिलचे रेकॉर्ड मोडणारा कुणी असेल काय हा उत्सुकतेचा विषय आहे.

Leave a Comment